उस्मानाबाद जिल्ह्यात ७४ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, चार जणांचा मृत्यू

3Corona_102
3Corona_102

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये शनिवारी (ता.दहा) ७४ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून चार जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसभरामध्ये १६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आता बरे होण्याऱ्यांची संख्या ११ हजार १६४ वर पोचली आहे. बरे होण्याचे प्रमाण ८३.९९ टक्के इतके झाले असून त्याचवेळी मृत्युदराने मात्र चिंता वाढविल्याचे चित्र आहे. अजुनही मृत्युचा दर ३.२२ टक्के इतका आहे.

नवीन चार रुग्णांचा मृत्यु झाल्याने मृताची संख्या ४२८ वर गेली आहे. जिल्ह्यातील १७६ जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यामध्ये १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर ५३० जणांच्या जलद अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असुन त्यातून ६० जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यातही उस्मानाबाद तालुक्यात १९ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तुळजापुरमध्ये प्रयोगशाळेतून दोन, तर अँटिजेन तपासणीद्वारे सात जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

उमरगा तालुक्यातही १४ जणांना लागण झाली आहे. त्यामध्ये दोन जणांचे अहवाल आले, तर १२ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्या शिवाय लोहारा तीन, कळंब आठ, वाशी आठ, भूम तीन, तर परंडा दहा अशी तालुकानिहाय वाढलेल्या रुग्णांची संख्या आहे. उस्मानाबाद शहरातील तांबरी विभागामध्ये दहा जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर भानुनगर येथे दोन जण बाधित झाले आहेत. तुळजापुर तालुक्यातील अणदुरमध्ये तीन व इतर चार जण बाधित झाले आहेत. उमरगा तालुक्यातील कवटा गावामध्ये सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. वाशी शहरामध्येही चार जणांना लागन झाले आहे.


चार जणांचा मृत्यु
वाशी तालुक्यातील हातोळा येथील ७० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील सकणेवाडी येथील ६० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला. वाशी शहरातील ७० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला. वाशीच्याच दुसऱ्या एका ५८ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची नोंद आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com