हिंदुच्या सुरक्षेची आता माझी जबाबदारी- इम्तियाज जलील

हिंदुच्या सुरक्षेची आता माझी जबाबदारी- इम्तियाज जलील

औरंगाबाद: पराभवानंतर शिवसेना पुन्हा एकदा हिंदूच्या सुरक्षेचा विषय पुढे करीत आहे. मात्र, हे चुकीचे आहे. त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच राहीलेला नाही. मी केवळ मुस्लिमांचा खासदार नाही, तर आता सर्व धमिर्यांचा खासदार आहे. त्यामुळे हिंदूच्या सुरक्षेची माझी जबाबदारीच आहे आणि मी ती पार पाडेल, असे औरंगाबादचे नविर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

क्‍लब चालकांकडून पोलिसांना हप्ते 
शहरात सुरु असलेले क्‍लब, गुटखा विक्रीसह अन्य अवैध धंदे बंद करण्यासाठी आपले कायम प्रयत्न राहीलेले आहेत. बेगमपुरा येथे कॉंग्रेसचे माजी नगरसेवक यांचा क्‍लब सुरु आहे. त्यांच्याकडून बेगमपुरा येथील पोलिस हप्ते घेतात. त्या क्‍लबवर कारवाई करून संबधित पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकास निलंबीत करावे, यासाठी आपण पोलिस ठाण्यासमोरच धरणे धरणार आहोत, असेही खासदार इम्तियाज यांनी सांगीतले.

दंगलखोर "एमआयएम'च्या मंचावर कसे?
एकीकडे सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी खासदार म्हणून माझ्यावरच आहे, असे म्हणायचे आणि दुसरीकडे दंगलीचे गुन्हे दाखल असलेले मंचावर सोबत घ्यायचे, असे कसे?, असा प्रश्‍न पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर ते म्हणाले, दंगल, अवैध धंदे करणाऱ्यांचे समर्थन आपण कधीच करणार नाही. त्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी मी प्रयत्नशील असेल, असेही खासदार इम्तियाज यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com