सचखंड एक्सप्रेसचे नवे रुप 

सचखंड एक्सप्रेसचे नवे रुप 

नांदेड : नांदेड ते अमृतसर दरम्यान धावणारी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाची सर्वात यशस्वी रेल्वे गाडीला २० वर्षांनंतर नवीनप्रणालीचे डबे जोडले गेले आहेत. गुरुवार (ता.27) रोजी सकाळी 9.30 वाजता श्री हजुरसाहिब रेल्वे स्टेशन (नांदेड) येथून नवीन डब्यांचे पांघरण घालून सचखंड एक्सप्रेस अमृतसरच्या दिशेने निघाली. 

यावेळी गाडीला फुलांनी सजावून जल्लोषात हिरवी झंडी दाखविण्यात आली. या कार्यक्रमाला नांदेडचे महापौर शिलाताई किशोर भवरे, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासकीय अधिकारी डी.पी.सिंघ, गुरुद्वारा अधीक्षक गुरींदरसिंघ वाधवा, नगरसेविका प्रकाशकौर खालसा, रेल्वे कमेटीचे उमाकांत जोशी, अतिरिक्त व्यवस्थापक विश्वनाथ, मुख्य वाणिज्य अधिकारी नेहा रत्नाकर, स्टेशन मास्टर भिसे, अवतारसिंघ पहरेदार, जसपालसिंघ लांगरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

गुरुवारी रवाना झालेल्या गाडीला जर्मन तंत्रज्ञानाने निर्मित 22 नवे डबे लावले गेले होते. त्यात एसी-2 चा एक डब्बा, एसी-3 चे चार डबे, जनरल स्लीपरचे बारा डबे, दोन जनरल डबे, एक पॅन्ट्री कार, एक सुरक्षा रक्षकांचा कोच व पार्सल कोच असे डबे होते. नवीन डब्यात बसण्यासाठी सुविधात्क आसन, प्रत्येक सीट साठी मोबाईल चार्जर, शौचालय, वॉश बेसिन, हॅंगर, अग्निसुरक्षा किट, डिजिटल डिस्पले आदीं सुविधांचा समावेश आहे.

नवीन डब्याप्रमाणे आता सचखंड एक्सप्रेस मध्ये 134 प्रवाशी क्षमता वाढली आहे. वातानुकूलीत कोचेस मध्ये लक्झरी असा अनुभव येऊ लागला आहे. पहिल्या नजरेतच प्रवाश्यांना विदेशीस्तराच्या सेवेचे अनुभव जाणवले. पंजाबहुन आलेल्या सर्व प्रवाश्यांनी नवीन डब्यांचे कौतुक केले आहे. नांदेड आणि अमृतसरचा प्रवास अंतर दोन हजार किलोमिटर एवढा आहे. तेव्हा नवीन तंत्रज्ञानामुळे आता प्रवाश्यांना आरामदायक यात्रा अनुभवयला मिळेल असे रेल्वे एडीआरएम विश्वनाथ यांनी सांगितले. गुरुद्वाराचे प्रशासकीय अधिकारी डी.पी.सिंघ यांनी रेल्वे बोर्डाचे आणि नांदेड रेल्वे डिविजनचे आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com