धरण भरलेले; पण गोदापात्र तहानलेले

लक्ष्मीकांत कुलकर्णी
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

कुंभार पिंपळगाव (जि.जालना) - राज्यात नाशिकसह पश्‍चिम महाराष्ट्रात महापुराचा हाहाकार सुरू आहे; मात्र अजूनही जालना जिल्ह्यात पावसाची केवळ रिमझिमच आहे. गोदावरी नदीवरील पैठणचे नाथसागर धरण भरण्याच्या मार्गावर असताना जालना जिल्ह्यातील अनेक गावांतून जाणाऱ्या गोदावरीचे पात्र मात्र तहानलेलेच आहे. पूर्णपणे भरलेल्या नाथसागरातून एकाच वेळी पाणी सोडण्याऐवजी नियोजन ठेवून विसर्ग सुरू केल्यास गोदाकाठावर पूरस्थिती उद्‌भवणार नाही, शिवाय नदीवरील बंधाऱ्यातही पाणीसाठा करता येईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

घनसावंगी तालुक्‍यातील गुंज, भादली, सिरसवाडी, काळेगाव येथील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी गेल्या उन्हाळ्यात दोन-चार वेळा आंदोलने केली, पात्रात उपोषण केले; मात्र या गावांना पाणी मिळाले नाही. गुंजकरांना तर दुष्काळाचे सर्वांत जास्त चटके सहन करावे लागले. आता पावसाळा सुरू झाल्यावर गोदावरीत पाणी येईल, अशी आशा होती; मात्र अर्धा पावसाळा होऊनही पात्र कोरडेच राहिले आहे. नाशिकला गोदावरीने रौद्र रूप धारण केल्यानंतर आलेल्या महापुरात पैठणचे नाथसागर धरण पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहे; मात्र पात्र अजूनही कोरडेच आहे. 

जिल्ह्यात गोदावरी नदीकाठावर महत्त्वाची 38 गावे आहेत. मात्र, ही गावे अजूनही तहानलेली आहेत. गोदावरी नदीपात्रात पाणी सोडल्यास या गावांता मोठा आधार होईल. 
 
गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी आंदोलने केली, पात्रात उपोषण केले इतकेच नव्हे, तर पाटबंधारे खात्याकडे हजारो रुपये पाणीपट्टी भरली; मात्र पात्रात पाणी सोडले गेले नाही. पैठणचे धरण भरत आल्याने पाण्याची आशा आहे. महापुर येऊन नुकसान होण्याआधी गोदापात्रात पाणी सोडावे. 
ज्ञानदेव कचरे, 
ग्रामस्थ, गुंज बुद्रुक 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New of Gadavari river