जिल्ह्यात होणार नवीन दहा आरोग्य केंद्रे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

औरंगाबाद - जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला दहा ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रे, तर तीन ठिकाणी उपकेंद्रे सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. ही १३ केंद्रे  कार्यान्वित झाल्याने ग्रामीण भागातील जनतेला आरोग्यविषयक सेवा मिळण्यास मदत होणार आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी ग्रामीण भागात आरोग्यविषयक सुविधांची पाहणी केल्यानंतर नवीन आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे सुरू करण्याची आवश्‍यकता असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार त्यांनी सर्वसाधारण सभेत ठराव मांडून  दहा ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या निर्मितीसह तीन ठिकाणी उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. तसा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला होता. दरम्यान, औरंगाबाद तालुक्‍यातील भांबर्डा, पाटोदा व खुलताबाद तालुक्‍यातील गोळेगावला  उपकेंद्र होणार आहे.

येथे होणार सुविधा
गंगापूर - जागेश्‍वरी 
खुलताबाद - तीसगाव 
वैजापूर - महालगाव व धोंदलगाव 
औरंगाबाद - साजापूर 
पैठण - पैठणखेडा, वडवळी, सोलनापूर, नवगाव 
सिल्लोड - अंभई

Web Title: New Health Centers in aurangabad