esakal | समाजातील नवा आदर्श : गौरी ऐवजी जिजाऊ- सावित्रीच्या प्रतिमेचे पूजन, कुठे ते वाचा?
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

वसमत येथील उच्चशिक्षित दळवी परिवाराची मागील १० वर्षाची परंपरा 

समाजातील नवा आदर्श : गौरी ऐवजी जिजाऊ- सावित्रीच्या प्रतिमेचे पूजन, कुठे ते वाचा?

sakal_logo
By
पंजाब नवघरे

वसमत (जिल्हा हिंगोली) : पारंपरिक गौरी पूजनाच्या ऐवजी वसमत येथील नामदेव दळवी आणि मीना दळवी या दाम्पत्यांनी त्यांच्या घरी राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धकृती प्रतिमेची पूजा करून समाजाला नवपरीवर्तनाचा जणू संदेशच दिला आहे. त्यांचा आदर्श समाजातील अन्य नागरिकांनी घ्यावा असे परिसरातून ऐकावयास मिळत आहे. मागील १० वर्षांपासून अशाच पद्धतीने हा सण ते साजरा करतात.
 
आधूनिक भारताच्या शिक्षणामध्ये गौरी ह्या कोण आहेत? त्यांचा इतिहास काय आहे? आणि मानवी जीवनात त्यांचे योगदान काय आहे ? यांचा अभ्यास करीत बसण्यापेक्षा ज्या दोन मातांनी उभ्या जगाला खूप मोठा संदेश दिला आहे तो म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ यांनी या देशाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज असे दोन युगपुरुष दिले. ज्यांच्या माध्यमातून पुढे त्याने बहुजनांचे स्वराज्य उभे केले. इथल्या पीडित शोषितांना न्याय दिला आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी या देशातील महिलांना शिक्षणाची दारे खुली केली. कदाचित सावित्रीबाई फुले यांचा जन्मच झाला नसता तर या देशातील महिला गुलाम म्हणून जगल्या असत्या. केवळ चूल आणि मुलं या पलीकडे त्यांचा इतिहास गेला नसता.

हेही वाचा हिंगोली: कंदकुजी रोगामुळे हळद उत्पादक शेतकरी हैराण - डाॅ. अंकुश चोरमुलेंचा उपाययोजनेचा सल्ला

आरास म्हणून कृषी परंपरेतील साज ठेवले 

त्यामुळे या दोन महिलांच्या चरित्राचा अभ्यास करून वसमत येथील परिवर्तनवादी दाम्पत्य मीना नामदेव दळवी यांनी त्यांच्या घरी ह्या आधुनिक मातांचे पूजन करून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. या आधुनिक गौरीच्या समोर त्यांनी आरास म्हणून कृषी परंपरेतील साज ठेवले होते. तसेच समग्र भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले भारताचे संविधान, जगतगुरू तुकाराम महाराज यांची गाथा, संत नामदेवांची गाथा, भगतसिंग यांचे जीवन चरित्र या आणि अशा अनेक ग्रंथाची आरास त्यांनी लावली होती.

नेहमीच विद्यार्थ्यांना दिशादर्शक शिक्षण देत असतात

विशेष म्हणजे हे दोन्ही दाम्पत्य उच्च विद्याविभूषित असुन त्यांची वसमत तालुक्याच्या ठिकाणी एक शिक्षण संस्थाही आहे. या संस्थेच्या माध्यमातूनही ते नेहमीच विद्यार्थ्यांना दिशादर्शक शिक्षण देत असतात. त्यांचा हा आगळावेगळा प्रयोग वसमत तालुक्यातील नागरिकांचा कुतूहलाचा विषय आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image
go to top