नवविवाहितेची नवरा, सासऱ्याकडून जाळून हत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ 
तालुक्यातील अंजनवाडा येथे नवऱ्याला बायको, तर सासऱ्याला सून पसंत नसल्याने कार्तिका राठोड या नवविवाहितेला अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची घटना 10 जूनला घडली होती. जाळल्यानंतर नातेवाईकांनी तिला तातडीने उपचारांसाठी नांदेडच्या रूग्णालायात भरती केले होते, पण 7 दिवस तिची आयुष्याशी चालू असलेली झुंज काल (ता. 7) रात्री 9 वाजता अखेर संपली.

दरम्यान, कार्तिकाच्या मृत्यू प्रकरणी औंढा पोलिसांनी एकूण 13 जणांविरुद्ध 307 तर आता खुनाचा गुन्हा दाखल केला असून कार्तिकाचा पती आमोल राठोडसह सासू-सासरे दिर व इतर तीन अशा सात आरोपींना या पूर्वीच अटक केली आहे. 

मात्र इतर आरोपींना पोलीस अभय देत असून त्यांना अटक करत नसल्याने 
नातेवाईकांनी रात्री 11 वाजता कार्तिकाचा मृतदेह नांदेडवरून थेट औंढा पोलीस स्थानकात ठेवत उर्वरित आरोपींना अटक करण्याची मागणी करत पोलीस स्थानकात गर्दी केली होती.  

तब्बल दोन तासांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मयतेच्या नातेवाईकांची भेट घेत इतर आरोपींना अटक करण्याचे ठोस आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी कार्तिकाला पोलीस स्थानकातून अंत्यविधीसाठी गावाकडे नेले. दरम्यान या घटनेने आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतो काय, अशी शंका येत असून जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचारातून महिलांचे छळ व मृत्यू कसे होत आहेत हे अधोरेखित केले आहे.
 
Web Title: new married girl set on fire by husband and father in law