Coronavirus : वसमतमध्ये तिघांची कोरोनावर मात, एक नवा रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

वसमत येथील एका २७ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.

हिंगोली -  वसमत येथील कोविड केअर सेंटर येथे क्वारंटाइन केलेल्या तीन रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे; तर वसमत येथील एकाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज (शनिवारी) रात्री उशिरा प्राप्त झाला आहे. वसमत येथील एका २७ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. तो अशोकनगर येथील रहिवासी आहे. तसेच हयातनगर येथील तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे २२५ रुग्ण झाले असून, त्यापैकी १८६ रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला ३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत; तसेच कळमनुरी येथील कोविड केअर सेंटर येथे पाच रुग्ण आहे. यात जाम एक, दाती तीन, डोंगरकडा एक, येथील रहिवाशांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे दिसून येत नाहीत. याशिवाय कळमनुरी येथे एका एसआरपीएफ कोरोना रुग्णाला उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात 

जिल्हा सामान्य रुग्णालय येथील आयसोलेशन वॉर्डामध्ये एकूण ३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये चोंढी खुर्द पाच, सेनगाव तीन, रिसाला दोन, नगरपालिका चार, कालगाव सहा, सिरसम एक, ब्राह्मणवाडा एक, सुकळी एक, खानापूर एक, पेन्शनपुरा चार, भोईपुरा एक, कमलानगर एक अशा एकूण १९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्यात कोणतीही गंभीर लक्षणे नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
२,३२८ जणांचे अहवाल निगेटिव्ह 
जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्ड व कोरोना सेंटरमध्ये एकूण  २,८३५ रुग्णांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी २,३२८  रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. २,२८० रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. ५३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १३५ जणांच्या चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A new patient at Wasmat