पोलिस ठाण्याच्या नव्या इमारतीत शांतता 

सुभाष बिडे 
शनिवार, 1 एप्रिल 2017

घनसावंगी - शहर व परिसरात स्वतंत्र पोलिस ठाण्याची इमारत व पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवास्थानाचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासून पूर्ण झाले आहे. तरी अद्याप उद्‌घाटन झाले नसल्याने जुन्याच इमारतीत पोलिस ठाण्याचे कामकाज करण्यात येत आहे. 

घनसावंगी - शहर व परिसरात स्वतंत्र पोलिस ठाण्याची इमारत व पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवास्थानाचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासून पूर्ण झाले आहे. तरी अद्याप उद्‌घाटन झाले नसल्याने जुन्याच इमारतीत पोलिस ठाण्याचे कामकाज करण्यात येत आहे. 

घनसावंगी पोलिस ठाण्याची इमारत निजामकालीन व अत्यंत जुनी आहे. तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी आघाडी सरकारच्या काळात येथील पोलिस ठाणे व कर्मचारी निवासस्थानांसाठी निधी मंजूर करण्याबाबत पाठपुरावा केला. अंबड-कुंभारपिंपळगाव रस्त्यावर कर्मचारी निवासस्थानाच्या जागेवर अत्यंत प्रशस्त अशी पोलिस ठाण्याची इमारत व निवासस्थाने बांधण्यात आली. मात्र पूर्ण बांधकाम होऊनही पोलिस ठाणे व निवासस्थानांचे उद्‌घाटन झाले नाही. अजूनही पोलिस ठाण्याचे जुन्या इमारतीतून कामकाज चालत आहे. कर्मचाऱ्यांना जुन्याच निवासस्थानात तर काहींना भाडेतत्वावर राहावे लागत आहे. पोलिस ठाण्याच्या इमारतीबरोबर निवासस्थानांचे त्वरित उद्‌घाटन करून कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी जोर धरीत आहे. 

घनसावंगी येथील पोलिस ठाण्याची व निवासस्थानांसाठी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या इमारतीत किरकोळ कामे राहिली आहेत. या परिसरातील संरक्षक भिंतीचे काम करण्यात आले नाही तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारत अद्याप हस्तांतरित केली नाही. याबाबत वरिष्ठ स्तरावरून कार्यवाही झाल्यानंतर या इमारतीत पोलिस ठाणे कार्यान्वित होईल. 
- संजय लोहकरे, पोलिस निरीक्षक, घनसावंगी 

Web Title: The new police station building