अडचणी जुन्याच, नव्याने अभ्यास - आमदार सावे

New Study for old Problems Says MLA sawe
New Study for old Problems Says MLA sawe

औरंगाबाद- तीस वर्षांपासुन पायभुत सुविधांसाठी वनवास भोगणाऱ्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीच्या खराब रस्त्यांवरुन आमदार अतुल सावे यांनी रविवारी (ता. 8) भटकंती केली. सुमारे तासभर चर्चा फिरुन झाल्यावर त्यांनी उद्योजकांशी चर्चा करत त्यांनी पाठपुराव करण्याचे आश्वासन उद्योजकांना दिले.

कर गोळा करणारे कार्यालय म्हणुन चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत पायभुत सुविधा देणे महापालिकेकडुन क्रमप्राप्त आहे. गेल्या तीस वर्षांत मात्र वर्षाकाठी सुमारे 50 कोटींचा कर गोळा करणाऱ्या महापालिकेने या वसाहतीला साधी ड्रेनेज लाईनही दिलेली नाही. या औद्यागिक वसाहतीच्या जुन्याच असलेल्या अडचणी समाजावुन घेण्यासाठी आमदार अतुल सावे यांनी रविवारी (ता. 8) चिकलठाणा औद्योगिक वसाहत गाठली.

वसाहतीत तब्ब्ल दोन तास घालवताना त्यांनी रस्त्याची पाहणी आणि उद्योजकांशी चर्चाही केली. यातील एक तास पाहणी केली आणि सर्व शहराला परिचित असलेल्या येथील आडचणींची नव्याने ओळख करुन घेतली. पाहणी झाल्यावर त्यांनी मराठवाडा आसोसिएशन ऑफ स्मॉल स्केल ऍण्ड ऍग्रीकल्चरच्या कार्यालयात भेट दिली. येथे उद्योजकांशी चर्चा करुन त्यांनी या प्रकतरणात लक्ष्य घालण्याचे आश्वासन दिले. या विषयी एक बैठक उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे लावणार असुन सुविधा देण्यासाठी बांधील असलेल्या एमएसईडीसीएल, एमआयडीसी आणि महापालिकेकडे आपण पाठपुरावा करु असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी अध्यक्ष किशोर राठी, उपाध्यक्ष अभय हंचनाळ, सचिव गजानन देशमुख, राहुल मोगले, अर्जून गायके, मनिष अग्रवाल, भगवान राऊत, आदींची उपस्थिती होती. 
 
विधीमंडळात विषय नेणार ः सावे 

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत असलेल्या आडचणींची पाहणी करुन उद्योजकांशी आपण यावर त्यांचाशी चर्चा केली आहे. एमएसईडीसीएल, महापालिका आणि एमआयडीसी या विभागांकडे आपणही पाठपुरावा करणार आहोत. या विषयी एक बैठक उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडेही बैठक लावणार असल्याचे आमदार अतुल सावे म्हणाले. या विषयाला आपण विधीमंडळातही वाचा फोडणार असल्याचे सावे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com