अनेकांच्या बोटांना लागणार प्रथमच शाई 

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

जालना - विधानसभा निवडणुकीत नवमतदारांमध्ये उत्साह दिसून येत असून 34 हजार 401 युवक पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रचारादरम्यान विविध पक्षांचे उमेदवार नवमतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात ता. 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीत ता. 31 ऑगस्ट 2019 नुसार अंतिम मतदारांची संख्या 15 लाख 54 हजार 110 एवढी आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 8 लाख 16 हजार 229 तर स्त्री मतदारांची संख्या 7 लाख 36 हजार 367 एवढी आहे. तर नवमतदार म्हणून नावनोंदणी झालेल्या 18 ते 19 वर्षांतील युवकांची संख्या 34 हजार 401 एवढी आहे. लोकशाहीत पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळणार असल्याने नवमतदारांमध्येही निवडणुकीचा उत्साह संचारल्याचे पाहायला मिळत आहे. पाचही विधानसभा मतदारसंघांत नवमतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने विविध पक्षांचे उमेदवार नवमतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

सामाजिक प्रश्‍नांची जाण असलेल्या तसेच विकासाची दूरदृष्टी असलेल्या शिक्षित उमेदवारालाच माझे मत असणार आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक विकासाचे व्हिजन असलेला उमेदवाराच युवकांनी निवडला पाहिजे. 
- निकिता सोनटक्के, जालना 
...... 
समाजातील विविध घटकांचे मूलभूत प्रश्‍न सोडवणारा स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार निवडणार आहे. चांगले शिक्षण आणि रोजगाराच्या संधी देऊ शकणाऱ्या उमेदवाराला युवकांनी निवडले पाहिजे. 
- शशिकांत इंगळे, जालना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com