नव्या कामगारांना आता द्यावे लागणार ओळखपत्र

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - शहरातील दुकानांत कामाच्या शोधात येणाऱ्या नव्या कामगारांना जिथे काम मिळेल तेथे ओळखपत्र आणि आपली कौटुंबिक माहिती दुकानमालकाला द्यावी लागणार आहे. सचिन अंदुरे प्रकरणानंतर सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा व्यापारी महासंघाने हा निर्णय घेतला आहे. याविषयी लवकरच महासंघाशी संलग्न असलेल्या सर्व संघटनांना पत्र पाठविले जाणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी ‘सकाळ’ला दिली.

शहरातील छोट्या दुकानापासून ते शोरूममध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार काम करतात. यातील काही लोक जुने आणि विश्‍वासू आहेत. मात्र यातील काही लोक तात्पुरत्या स्वरूपात काम करतात. सतत काम सोडणाऱ्यांची माहिती दुकानमालकांकडे नसते. यामुळे यापुढील काळात काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी खबरदारी म्हणून नव्याने कामावर येणाऱ्यांची ओळखपत्रासह बेसिक माहिती दुकानमालकास देणे जिल्हा व्यापारी महासंघाने बंधनकारक केले आहे. 

औद्योगिक वसाहतींमधील विविध कंपन्यांत काम करणाऱ्या कामगार, मजुरांना काम मिळण्याअगोदर ठेकेदारांना ओळखपत्र द्यावे लागते. मात्र शहरातील छोट्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांकडून मालक कसलेच ओळखपत्र घेत नाहीत. यामुळे दुकानमालकही अडचणीत येतो. आता ओळखपत्र आणि बेसिक माहिती दुकानांच्या मालकास देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. २५ ऑगस्टपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही श्री. काळे यांनी सांगितले.

आमच्याशी जिल्ह्यातील ७२ संघटना संलग्न आहेत. त्यांना आम्ही याविषयीचे पत्र पाठवणार आहोत. येत्या २५ ऑगस्टपासून याची अंमलबजवाणी करण्यात येईल. व्यापाऱ्यांनी सुरक्षिततेसाठी आपल्या कामगारांची माहिती घेऊन ठेवावी.
- जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

Web Title: New Worker Identity Jagannath Kale