
माजलगाव तालुक्यातील लवुळ येथील दिपाली महादेव विघ्ने (वय २०) या नवविवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून बुधवारी (ता. ०९) आत्महत्या केली.
माजलगाव (जि.बीड) : तालुक्यातील लवुळ येथील दिपाली महादेव विघ्ने (वय २०) या नवविवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून बुधवारी (ता. ०९) आत्महत्या केली. या प्रकरणी सासरच्या चार जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील लवुळ येथील महादेव प्रकाश विघ्ने याचे किट्टी आडगाव येथील गणेश घुले यांची मुलगी दिपालीशी मागील आठ महिण्यापूर्वी ३ मार्चला विवाह झाला होता. परंतु लग्नात ठरल्याप्रमाणे हुंडा न दिल्याने दिपालीला सासरकडील मंडळी वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देत होते. त्यामुळे या त्रासाला कंटाळून दिपालीने घरात कोणी नसतांना घरातील खिडकीला गळफास घेउन बुधवारी दुपारी आत्महत्या केली. त्यावर दिपालीचे मामा आण्णा बापुराव आगे यांच्या फिर्यादीवरून तिचा पती महादेव, दिर केशव, सासू विमल व मावस सासू मैनाबाई उगले (रा. चिंचगव्हाण) या चार जणांविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited - Ganesh Pitekar