बाहेर राहून किती दिवस चालेल, सोबत या, विनोद पाटलांना आदित्य ठाकरेे यांची आॅफर

मधुकर कांबळे
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी न्यायलयीन लढा देणारे याचिकाकर्ते व राष्ट्रवादीचे युवानेते विनोद पाटील यांना शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी (ता.30) ऑफर दिली. विनोद पाटील यांच्या निवासस्थानी सुमारे 10-15 मिनिटे चर्चा केली. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चर्चेत श्री. ठाकरे यांनी "तरुणांसाठी काम करायचे असेल, तर असे बाहेर राहून किती दिवस चालेल, आमच्या सोबत या, एकत्रित काम करू" असे आवाहन केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मराठा आरक्षणासाठी न्यायलयीन लढा देणारे विनोद पाटील यांना शिवसेनेत घेण्याच्या जोरदार हालचाली वरिष्ठ पातळीवरून सुरू आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यात महत्त्वाची  भूमिका बजावत आहेत. मराठा आरक्षणा संदर्भातील मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत या विरोधातील याचिका फेटाळल्यानंतर सर्वप्रथम विनोद पाटील मातोश्रीवर गेले होते. तेव्हापासूनच विनोद पाटील शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. परंतु, मराठा आरक्षणाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी आपण गेलो होतो, असे त्यावेळी विनोद पाटील यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेकडून विनोद पाटील यांना मैदानात उतरवण्याची जोरदार तयारी झाली होती. परंतु, युतीने आपणास पुरस्कृत करावे अशी मागणी पाटील यांनी केल्याने हा प्रयत्न फसल्याची चर्चा त्यावेळी झाली. 

विनोद पाटील आर. आर. पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम करीत असतानाच त्यांना मराठा आरक्षणासाठीचा न्यायलयीन लढादेखील सुरू ठेवला होता. मराठा समाजाची एकजूट आणि न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली. मराठा तरूण नेतृत्व म्हणून शिवसेनेने विनोद पाटील यांनी आपल्या पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शुक्रवारी (ता. 30) जन आशीर्वाद यानेनिमित्त शहरात आलेले आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी विनोद पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने पुन्हा त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झालेली ही भेट पाहता विनोद पाटील लवकरच हाती शिवबंधन बांधण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

आदित्य ठाकरे हे तरुणांचे नेते म्हणून ओळखले जातात. प्राथमिक ते उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात ते महाराष्ट्रातील तरुणांसाठी काम करीत आहेत. मीदेखील शिक्षणाच्या क्षेत्रात काम करतो. त्यामुळे आजच्या बैठकीत तरुणांना केंद्रबिंदू ठेवून त्यांच्यासाठी भविष्यात सोबत येऊन कसे काम करता येईल यावर आमच्यात चर्चा झाली. आदित्य ठाकरेंनी आमच्या सोबत या, मिळून काम करू अशी इच्छा त्यांनी व्यक्‍त केली. ही सदिच्छा भेट होती. 
- विनोद पाटील 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about adity thakre