मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे गुरुवारी प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

उस्मानाबादेत होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन गुरुवारी (ता. सात) करण्यात येणार आहे.

उस्मानाबाद : उस्मानाबादेत होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन गुरुवारी (ता. सात) करण्यात येणार आहे.

साहित्य संमेलनाची शहरात जय्यत तयारी सुरू आहे. संमेलनाच्या निमित्ताने जिल्ह्याचा इतिहास मांडणारे बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. या बोधचिन्हाचे प्रकाशन गुरुवारी सकाळी साडेदहाला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी दिली.

सोलापूर येथील उद्योजक दत्तात्रय सुरवसे, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन उपस्थित राहणार आहेत. साहित्यिक, साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन तावडे यांनी केले आहे. 
साहित्य संमेलन 10 ते 12 जानेवारी 2020 या कालावधीत उस्मानाबादेत होत आहे. यंदाच्या साहित्य संमेलनाचा बहुमान मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेला मिळाल्याने या परिसरातील साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, भौगोलिक, इतिहास साहित्यविश्वासमोर ठळकपणे अधोरेखित करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्याअनुषंगाने संमेलनाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about All India Marathi Literature Conference