AMC : तिजोरीत खडखडाट, तरीही प्रशासन सुस्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

महानगरपालिकेच्या तिजोरीत गेल्या काही वर्षांपासून खडखडाट असला तरी मालमत्ता कर, पाणीपट्टीची वसुली कासवगतीने सुरू आहे. चालू आर्थिक वर्षात म्हणजेच गेल्या चार महिन्यांत मालमत्ता कराची अवघी 40 कोटी 65 लाख रुपयाची वसुली झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वसुली एक कोटी 14 लाख रुपयांनी जास्त असली उद्दिष्टाच्या मानाने वसुली अत्यल्प आहे. 

औरंगाबाद - महानगरपालिकेच्या तिजोरीत गेल्या काही वर्षांपासून खडखडाट असला तरी मालमत्ता कर, पाणीपट्टीची वसुली कासवगतीने सुरू आहे. चालू आर्थिक वर्षात म्हणजेच गेल्या चार महिन्यांत मालमत्ता कराची अवघी 40 कोटी 65 लाख रुपयाची वसुली झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वसुली एक कोटी 14 लाख रुपयांनी जास्त असली उद्दिष्टाच्या मानाने वसुली अत्यल्प आहे. 

मालमत्ता कराच्या वसुलीचे यंदा 2019-20 या आर्थिक वर्षात 250 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, तर गतवर्षीच्या थकबाकीसह हा आकडा 439 कोटींवर गेला आहे. महापालिकेच्या दप्तरी दोन लाख 34 हजार मालमत्ताधारकांची नोंद असून, त्यांना मागणीपत्र देण्यात आले आहेत. व्यावसायिक मालमत्तांधारकांकडूनही कराची वसुली केली जात आहे. प्रशासनाने एक एप्रिल ते नऊ ऑगस्ट या चार महिन्यांत 40 कोटी 65 लाख 98 हजार 861 रुपयांचा कर वसूल केला आहे. गतवर्षी नऊ ऑगस्टपर्यंत मालमत्ता कराची वसुली 39 कोटी 51 लाख 11 हजार रुपये एवढी झाली होती. या वर्षी मात्र 40 कोटी 65 लाख रुपये इतकी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत एक कोटी 14 लाख 87 हजार 358 रुपयाने अधिक झाल्याचे महावीर पाटणी यांनी सांगितले. 

प्रभागनिहाय वसुली
प्रभाग रक्कम
एक  3 कोटी 9 लाख 
दोन  3 कोटी 34 लाख 90 हजार 
चार 2 कोटी 40 लाख 83 हजार 
पाच  7 कोटी 56 लाख 22 हजार 
सहा  2 कोटी 52 लाख 35 हजार 
सात 8 कोटी 55 लाख 90 हजार 
आठ  3 कोटी 41 लाख 69 हजार
 
नऊ
4 कोटी 75 लाख 84 हजार 
मुख्यालय 3 कोटी 41 लाख 69 हजार 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about AMC tax collection