त्या व्यापाऱ्यां विरोधात बाजार समितीच गुन्हा नोंद करू देईना!

प्रकाश बनकर
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

औरंगाबाद: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या करमाड उपबाजार समितीत शेतकऱ्यांचा 26 लाखा माल घेऊन फरार झालेल्या व्यापाऱ्याविरोधात आद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. सोमवारी (ता. 30) या प्रकरणी गुन्हा नोंद होणार होता; मात्र बाजार समितीने अधिकारी पाठवून त्या व्यापाऱ्याविरोधात गुन्हाच नोंद होऊ दिला नाही. पोलिसांनीही गुन्हा दाखल न करता शेतकऱ्यांकडून दोन दिवसांची मुदत मागितल्याची माहिती समोर आली आहे. 

आधीच विविध-आरोप-प्रत्यरोपामुळे औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती चर्चेत आहे. करमाडच्या उपबाजार समितीतील शॉपिंग कॉम्पेलक्‍स स्थानिकांऐवजी जालना आणि इतर ठिकाणच्या व्यापाऱ्यांना विकल्याचाही आरोपामुळेही चांगलीच चर्चेत आली आहे. करमाड उपबाजार येथे समितीने डाळिंब मार्केट सुरू केले. तेव्हा बाजार समितीने व्यापारी कसे आहेत हे न पाहाता सर्वांना परवाने दिले. त्यामुळे 55 शेतकऱ्यांचा 26 लाखाचा माल घेऊन एक व्यापारी फरार झाला आहे. 

बागडेंकडेही तक्रार 
जवळपास महिनाभरापूर्वी ही फसवणूक झाली आहे. त्याची तक्रार शेतकऱ्यांनी बाजार समिती, सभापती राधाकिसन पठाडे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली. एवढे होऊनही साधा गुन्हा आद्याप दाखल झालेला नाही. सोमवारी गुन्हा दाखल होईल याच अशेने दहा ते पंधरा शेतकरी करमाड पोलिस ठाण्यात आले. बाजार समितीतून दोन अधिकारी पोलिस ठाण्यात आले. बाजार समिती अधिकारी आणि पोलिसांत पंधरा ते वीस मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर दोन दिवस द्या. त्यानंतर गुन्हा दाखल करू असे विनंती पोलिस निरीक्षक रायकर यांनी शेतकऱ्यांना केली. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about APMC Market