उमेदवारी दाखल करण्याची दानवेंना सूचना, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

मधुकर कांबळे
शनिवार, 27 जुलै 2019

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले.शनीवारी (ता.27) सकाळी अंबादास दानवे यांना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत.

औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले.शनीवारी (ता.27) सकाळी अंबादास दानवे यांना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत.

१ ऑगस्ट रोजी उमेदवारी दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दानवे कोणता मुहूर्त साधणार यावर चर्चा सुरू झाली आहे. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून राज्यमंत्री अर्जुन खोतकर , नगरसेवक राजू वैद्य, नरेंद्र त्रिवेदी आणि प्रकाश चव्हाण यांच्या शुक्रवारी (ता.26) मातश्रीत मुलाखती झाल्या होत्या,  मात्र या मुलाखतीत श्री दानवे नव्हते.  

तथापि लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांची काळजी करू नका असे सूचक वक्तव्य केले होते, त्यानुसार श्री दानवे यांचे नाव पुढे आल्याचे बोलले जाते. त्यांना पक्षाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, अद्याप अधिकृत पत्र मिळाले नसल्याचे अंबादास दानवे यांनी  सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about candidate application form