चोरीसाठी नकार देणाऱ्या दांपत्यावर हल्ला, पत्नी ठार

जयाबाई पवार
जयाबाई पवार

लोहारा (जि. उस्मानाबाद) : चोरी करण्यासाठी सोबत येण्यास नकार देणाऱ्या पती, पत्नीवर चौघांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला; तर पती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना तालुक्यातील जेवळी येथे शनिवारी (ता. सात) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारधी समाजातील संतोष पवार हे आपल्या कुटुंबासह जेवळी येथे वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गुन्हेगारीपासून दूर राहत ते काम करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहेत. दरम्यान, त्यांच्या समाजातील विलास भोसले, अर्जुन भोसले, किरण भोसले व विशाल भोसले हे चौघे शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास संतोष पवार यांच्या घरी आले. त्यांना झोपेतून उठवून चोरी करण्यासाठी आमच्या सोबत चला, असे म्हणाले; मात्र संतोष पवार यांनी ठाम नकार दिला.

त्यामुळे संतप्त झालेल्या विलास भोसले व त्यांच्या अन्य साथीदारांनी संतोष व त्यांच्या पत्नी जयाबाई पवार (वय ४५) यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात जयाबाई पवार यांचा जागीच मृत्यू झाला, अशी फिर्याद संतोष पवार यांनी लोहारा पोलिस ठाण्यात दिली आहे. या मारहाणीत संतोष पवार हे देखील गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी लोहारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रविवारी (ता. आठ) दुपारी उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले यांनी ही भेट दिली. याप्रकरणी संतोष पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विलास भोसले, अर्जुन, विशाल, किरण (रा. सिंदगाव, ता. तुळजापूर) या चौघांविरुद्ध लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अशोक चौरे तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com