टेलिफिशिंगमध्येही 'सोशल' इंजिनिअरिंग

Cybercrime
Cybercrime

औरंगाबाद - एरवी राजकारणात "सोशल इंजिनिअरिंग'चे प्रयोग आपण ऐकले असतील; पण टेलिफिशिंगमध्येही "सोशल इंजिनिअरिंग' ऐकले तर नवल वाटेल; मात्र ही बाब खरी आहे. सायबर भामटे आपले सोशल प्रोफाइल पाहून, स्वभाव, व्यवहाराचा अभ्यास करून प्रोफेशनल प्लॅन बनवीत आहेत. त्यानंतर कॉल करून थापा, प्रलोभन, आमिषे दाखवीत फसवणूक करीत असल्याचे प्रकार घडत असून, अशा भामट्यांसोबत शेरास सव्वाशेर वागण्याची गरज आहे. 

डिजिटल क्रांतीमुळे आता तळहाताएवढ्या मोबाईल स्क्रीनवर पूर्ण विश्‍वाची खबरबात आणि व्यवहार होत आहेत; परंतु डिजिटलायझेनशमुळे सायबर क्राईमचेही विविध प्रकार समोर येत आहेत. यात टेलिफिशिंग हा फसवणुकीचा प्रकार वाढताच असून, अद्यापही सामान्यजनांमध्ये याबाबत हवी तितकी जागरूकता नाही. ही बाब वाढत्या फसवणुकीमुळे दिसून येते. अज्ञान व सजगतेच्या अभावामुळे अनेकजणांच्या वॉलेटवर दरोडा पडत असून, खबरदारी घेतल्यास फसवणूक टळू शकेल. सायबर सजगतेसाठी www.isea.gov.in या केंद्र शासनाच्या सी-डॅकच्या वेबसाइटवर अधिक माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. 
 
टेलिफिशिंग म्हणजे काय? 
फिशिंग म्हणजे गळ टाकणे. टेलिफिशिंग म्हणजे फोनद्वारे गळ टाकणे. पैसे डिजिटल मार्गाने उकळण्यासाठी फोन, मोबाईल ऍपद्वारे संभाषण करून थापा मारून विश्‍वास संपादन करणे. आपल्या वैयक्तिक, बॅंक खात्याची माहिती विचारून ओटीपी हस्तगत करून परस्पर आर्थिक फसवणूक करणे. 
 
ट्रु-कॉलरमुळेही फसू शकता 
फोन करून ज्या कंपनीतून बोलत असल्याचे भामटे सांगतात त्या कंपनीसंबंधित संपर्क क्रमांक वाटावा व विश्‍वास बसावा म्हणून भामटे मुद्दामहून ट्रु-कॉलर ऍपवर अशाच पद्धतीची माहिती फीड करतात. त्यामुळे आपला चटकन विश्‍वास बसतो व आपण फसले जातो. (उदा. हे क्रमांक बॅंक, विमा कंपनी, क्रेडिट कार्ड कंपनी, नोकरी आदी क्षेत्रांशी निगडित वाटतो.) 
 
कोण करतात फसवणूक? 
उत्तरप्रदेशातील काही भाग, झारखंडमधील बरीयापूर, जामतारा आदी परिसरातील टोळ्याच टेलिफिशिंगसाठी सक्रिय आहेत. बॅंकेसंबंधी, क्रेडिट कार्डसेवा, जॉब देणारी कंपनी, विमा क्षेत्रातून बोलत असल्याचे सांगत आमिषे दाखवून ते माहिती मिळवितात व फसवणूक करतात. अलीकडेच तेथील दोघांच्या सायबर पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या. 
  
सायबरतज्ज्ञ व सायबर ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल खटावकर सांगतात....

  • कोणत्याही कॉलला थारा देऊ नका. 
  • बॅंक, क्रेडिट कार्ड, इन्शुरन्स कंपनी कधीच डिटेल्स मागवत नाही. 
  • नाव, गाव, पत्ता, जन्मतारीख, खाते क्रमांक फोनवर शेअरच करू नये. 
  • ओटीपी कधीच शेअर करू नका. 
  • फसवे मेसेज मोबाईलवर येतात. ओळखीतील व्यक्तीही ते शेअर करतात; पण त्यातील लिंक ओपन करू नका. 
  • या लिंकमध्ये कोणतीही वैयक्तिक व बॅंकेसंबंधी माहिती फीड करू नका. 
  • पासवर्ड स्ट्रॉंग ठेवा, वारंवार बदला. 
  • मोबाईल सेवा देणाऱ्या कंपनीकडून डू नॉट डिस्टर्ब सेवा ऍक्‍टिव्हेट करा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com