पारंपरिक दसरा हल्लाबोलसाठी सचखंड नगरी सज्ज

प्रल्हाद कांबळे
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

सशस्त्र दलाचे आगमन

नांदेड - येथील गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहेब येथे पारंपरिक दसरा हल्ला- महल्ला सण येत्या मंगळवार (ता. आठ) साजरा करण्यात येत आहे. यासाठी धार्मिक नांदेड नगरी सज्ज झाली आहे. पंजाब आणि हरियाणा येथून निहंगसिंगांच्या सशस्त्र दलांचे शहरात आगमन झाले आहे. 

नांदेडच्या गुरुद्वारात पूर्वीपासूनच दसरा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची प्रथा आहे. दसरा सनानिमित्त गुरुद्वारात श्री दशम गुरुग्रंथ साहेब अंतर्गत श्री चंडी पाठाचे पठन व समापन करण्यात येते. तसेच गाभाऱ्यातील ऐतहासिक शस्त्रांचे पूजन यावेळी करण्यात येते. मंगळावरी (ता. आठ) ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता दरम्यान गुरुद्वारा सचखंड येथून दशहरा हल्ला- महल्ला ही पारंपरिक मिरवणूक काढण्यात येईल. मिरवणुकीत निशानसाहेब, कीर्तनकार जत्थे, भजनी मंडळी, बैंड पथक, घोडे आणि गतका जत्थे यांचा समावेश असणार आहे. तसेच पंजाबहुन आलेले दलं विशेष आकर्षण असणार आहेत.  महावीर चौक येथील हल्ला बोल चौक येथे पारंपरिकपणे मंगळवारी सायंकाळी पाच वाजून ५० मिनीटा दरम्यान हल्ला - महल्लाची अरदास होईल. सुमारे एक लाख भाविक नांदेडमध्ये दसरा सण साजरा करतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गुरुद्वारा बोर्डातर्फे दसरा सणासाठी व्यापक तैयारी करण्यात आली आहे. 

दल :  बाबा बिधिचंदजी दल, तरना दल, शिरोमणि पंथ अकाली बुड्ढा दलसह सहा दलांचे आगमण झालेले आहे.  गुरुद्वारा सिख छावनी, नगीनाघाट, बंदाघाट आणि गुरुद्वारा मातासाहेब येथे दलांच्या थांबण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about dasara hola mohalla in Nanded