esakal | पायी वारी करून दुष्काळमुक्तीचे साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

तुळजापूर ः तुळजाभवानीमातेला दुष्काळमुक्तीचे साकडे घालण्यासाठी सोलापूरच्या रूपाभवानी मंदिरापासून पायी वारी करत तुळजापूरला आलेले शेतकरी अनिल पाटील.

दुष्काळातून शेतकऱ्यांना मुक्ती दे, असे तुळजाभवानीमातेला साकडे घालण्यासाठी शिरापूर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील शेतकरी अनिल आबाजी पाटील यांनी शनिवारी (ता. 24) सोलापूरच्या रूपाभवानी मंदिरापासून तुळजाभवानी मंदिरापर्यंत पायी वारी केली.

पायी वारी करून दुष्काळमुक्तीचे साकडे

sakal_logo
By
जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) ः दुष्काळातून शेतकऱ्यांना मुक्ती दे, असे तुळजाभवानीमातेला साकडे घालण्यासाठी शिरापूर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील शेतकरी अनिल आबाजी पाटील यांनी शनिवारी (ता. 24) सोलापूरच्या रूपाभवानी मंदिरापासून तुळजाभवानी मंदिरापर्यंत पायी वारी केली.


या संदर्भात पाटील यांनी सांगितले, की यंदाही दुष्काळी परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बऱ्याच भागांत अजूनही सर्वदूर चांगला पाऊस नसल्यामुळे पिण्याचे पाणी, शेती, चारा आदी प्रश्‍न कायम आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. सोलापूर, तसेच मराठवाड्यातील अनेक भागांत ही स्थिती आहे.

दुष्काळ टळू दे, चांगला पाऊस होऊ दे, शेतकऱ्यांवर संकट टळू दे असे साकडे घालण्यासाठी सोलापूरच्या रूपाभवानी मंदिरापासून तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरापर्यंत पायी येऊन दर्शन घेण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार आज येथे दाखल झालो. शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याने केलेल्या या आगळ्या वारीची मंदिर परिसरात चर्चा होती. 

loading image
go to top