नायगाव, पाडोळीत अजूनही टॅंकरने पाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

सप्टेंबर उजाडला तरी परिसरात अपेक्षित पाऊस झाला नाही. पाणीसाठ्यात वाढ न झाल्याने गावाला अद्यापही टॅंकरनेच पुरवठा करण्यात येत आहे.

नायगाव (जि.उस्मानाबाद) ः सप्टेंबर उजाडला तरी परिसरात अपेक्षित पाऊस झाला नाही. पाणीसाठ्यात वाढ न झाल्याने गावाला अद्यापही टॅंकरनेच पुरवठा करण्यात येत आहे. नायगाव, पाडोळी गावांची तहान टॅंकरवर अललंबून आहे. टॅंकरची संख्या वाढविण्याची व मांजरा धरणातून पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

परिसरातील कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे जलस्तोत्र प्रवाहित होण्यासाठी आणि पाणीसाठा होण्यासाठी चांगल्या पावसाची गरज आहे. 
परिसरातील नदी, नाले, ओढे, विहिरी, कूपनलिका कोरड्याठाक आहेत. यापुढे पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचे संकट अधिकच गडद होणार आहे.

गेल्या तीन महिन्यांत झालेल्या अल्पशा पावसाने शेतकऱ्यांनी पेरणी केली. नंतरही पावसाचा लहरीपणा सुरूच राहिल्याने पिकांची वाढ झाली नाही. परिणामी या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने आधीच संकटात असलेली पिके आता अळ्या फस्त करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Drought