आमदार शिरसाट यांची डोकेदुखी वाढली, भाजपचे बंडखोर राजू शिंदे यांची उमेदवारी कायम

अनिल जमधडे
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद, : औरंगाबाद पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब गायकवाड यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, दुसरे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांनी उमेदवारी कायम ठेवत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यमान आमदार संजय शिरसाट यांची डोकेदुखी वाढली आहे.

औरंगाबाद पश्‍चिम हा राखीव विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. संभाव्य युतीची शक्‍यता लक्षात घेऊन या मतदारसंघात शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षांनी निवडणुकीची तयारी केली होती. अखेर शिवसेना-भाजप युती झाल्याने भाजपच्या इच्छुकांची पंचाईत झाली.

भाजपतर्फे बाळासाहेब गायकवाड व राजू शिंदे यांनी चार वर्षांपासून या मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली होती. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केले होते. शिवसेना-भाजपतर्फे बंडखोरांची समजूत घालण्याचे प्रयत्न झाले. पक्षादेश मानत बाळासाहेब गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, राजू शिंदे यांनी बंडाचे निशाण कायम ठेवले. मतदारांचा कौल जाणूनच आपण अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याचे श्री. शिंदे यांचे म्हणणे आहे. एकूणच परिस्थितीने विद्यमान आमदार संजय शिरसाट यांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about elecation