233 जणांनी दिली; 299 जणांना दृष्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

औरंगाबाद ः जिल्ह्यात गेल्या सव्वादोन वर्षांत 233 व्यक्तींनी केलेल्या मरणोत्तर नेत्रदानातून सहा नेत्रपेढींच्या माध्यमातून 299 अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली. तर गेल्या सव्वा वर्षात 10 हजार 51 व्यक्तींवर मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया झाल्या, अशी माहीती जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. सुनिता गोल्हाईत यांनी दिली.

देशभरात 25 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान, नेत्रदान पंधवाडा साजरा केला जातो. यात नेत्र तपासणी शिबिरे, व्याख्यान, पोस्टर प्रदर्शन, शाळा व महाविद्यालयात जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच मरनोत्तर नेत्रदानासाठी संकल्पपत्रे भरण्यासाठी प्रोत्साहीत केल्या जाते.2017-18 मध्ये 121 नेत्र दात्यांकडून 242 बुब्बुळांचे संकलन केल्या गेले. त्यातुन 134 अंध व्यक्तींवर नेत्ररोपण झाले. 2018-19 मध्ये 95 दात्यांकडून 190बुब्बुळांचे संकलन होऊन 136 तर एप्रिल 2019 ते जुलै 2019 दरम्यान, 17 दात्यांकडून 34 बुब्बुळाचे संकलन करुन 29 जणांना दृष्टी देण्याचे काम या उपक्रमातुन करण्यात आले. तसेच 2018-19 मध्ये 7762, तर एप्रिल 2019 ते जुलैपर्यंत 2289 मोतीबिंदुच्या मोफतशस्त्रक्रिया अंधत्व निवारण कार्यक्रमातून करण्यात आल्या.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. सुनिता गोल्हाईत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. संतोष काळे, डॉ. रेखा चाटे, डॉ. रुपा अंबेकर आदींनी यात पुढाकार घेतला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Eye donation