विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

टॉवरसाठी जागा संपादन केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. 14) दुपारी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने याबाबत सकारात्मक चर्चा करण्यास तयारी दाखविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले. 

उस्मानाबाद ः टॉवरसाठी जागा संपादन केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. 14) दुपारी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने याबाबत सकारात्मक चर्चा करण्यास तयारी दाखविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.

आमदार बच्चू कडू यांच्याकडून चर्चेसाठी पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष संतोष पवार यांच्या अध्यक्षतेखाली अण्णासाहेब दराडे, केदार सौदागर, विनोदसिंग परदेशी, भीमराव पाटील तसेच शेतकऱ्यांच्या वतीने ऍड. आशिष पाटील या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांच्याशी चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.

उपजिल्हाधिकारी खंदारे यांनी पत्राद्वारे सर्व शेतकऱ्यांचे जमीन, घर, विहीर, फळझाडे, पीक इत्यादींची पुन्हा मोजणी व पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ दिले; तसेच सर्व शेतकऱ्यांची मागणी प्रत्येक टॉवरला 25 लाख मिळावे ही होती. त्यासाठी आमदार कडू यांच्या माध्यमातून ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्यासोबत बैठक करण्याचे ठरले आहे. सर्व शेतकऱ्यांनी प्रहार कार्यकर्त्यांशी संपर्कात राहून आपले मोजमाप व पंचनामे व नुकसान मूल्यांकन करून घ्यावे. आंदोलनात प्रहारचे मनोज जाधव, दयानंद राठोड, प्रजय पवार, सोमनाथ झाडे, बालाजी डोळे, विजय नागरगोजे, गोपाळ घुगे; तसेच केसेगाव, इटकळ, येवती, खंडाळा, बामणी, महादेववाडी, कणघरा, बोरखेडा, समुद्रवाणी, पाडोळी, रायखेल, यमगरवाडी, तीर्थ, दस्तापूर, येणगुर, कोराळ, भोजगा या गावांचे शेतकरी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Farmers