खैरेंच्या पराभवाची सर्वच कारणे बागडेच आणतील समोर : महापौर

चंद्रकांत खैरे
चंद्रकांत खैरे

औरंगाबाद - लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाला महापालिका एक कारण असू शकते. इतर कारणे आता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हेच समोर आणतील, असे प्रत्युत्तर महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी (ता.29) दिले. 

"महापौर भरपूर काम करतात; पण नागरिक समाधानी नाहीत, आणखी कामे करण्याची गरज आहे," असा चिमटा विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी बुधवारी (ता. 28) बसपोर्टच्या भूमिपूजनप्रसंगी महापौरांना काढला होता. त्याविषयी विचारले असता श्री. घोडेले म्हणाले, श्री. बागडे माझ्यासाठी आदरणीय व्यक्ती आहेत. खैरे यांच्या पराभवाविषयी त्यांची तळमळ काल दिसून आली. ते अभ्यासू व्यक्तिमत्त्व असून, लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्यास त्यांनी सुरवात केल्याचे दिसून येत आहे. खैरे यांच्या पराभवासाठी महापालिका एक कारण असू शकते, इतर कारणे देखील आहेत. ती श्री. बागडे लवकरच जनतेसमोर आणतील, असे वाटते. 

महापालिकेत अनेक वर्षांपासून सेना-भाजपची युती आहे. त्यामुळे काही कामे झाली नसतील तर त्याला मला एकट्याला जबाबदार कसे धरता येईल? असा प्रश्‍न त्यांनी केला. शिवसेना पुढे जाणारा पक्ष आहे. पराभवाची कारणे शोधत न बसता आम्ही पुढे निघालो आहोत, असेही महापौरांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com