ओळखीतील तरुणासह चौघांनी केला बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

जालना भागातून भावाकडे राहण्यासाठी आलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. त्याहीपेक्षा गंभीर बाब अशी, की ओळखीतील तरुणाकडून तिच्यावर अत्याचार झाला, त्यानंतर इतर तिघांनी अत्याचार केला. पीडितेची प्रकृती नाजूक असून डॉक्‍टर दक्षता घेत आहेत. 

औरंगाबाद - जालना भागातून भावाकडे राहण्यासाठी आलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. त्याहीपेक्षा गंभीर बाब अशी, की ओळखीतील तरुणाकडून तिच्यावर अत्याचार झाला, त्यानंतर इतर तिघांनी अत्याचार केला. पीडितेची प्रकृती नाजूक असून डॉक्‍टर दक्षता घेत आहेत. 

जालना जिल्ह्यातील तरुणी मुंबईतील भावाकडे राहण्यासाठी आल्यानंतर चेंबूर परिसरात तिच्यावर अत्याचार झाला. हा अत्याचार तिच्या ओळखीतील तरुणाकडून झाला असून, त्यानंतर एकापेक्षा अधिक व्यक्तींनी तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, वेगाने सूत्रे हलविली जात आहेत. औरंगाबादेतील पोलिस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक एन. बी. शिंबरे यांनी तत्काळ गुन्हा नोंदवला.

त्यानंतर मुंबई पोलिसांनीही तत्परता दाखविली. मुंबईतील महिला पोलिस निरीक्षकाचा समावेश असलेले एक पथक औरंगाबादेत शुक्रवारी (ता. दोन) पोचले. पीडित मुलीचा जबाब घेण्यासाठी ते घाटी रुग्णालयात गेले; परंतु तिची प्रकृती नाजूक; तसेच ती पूर्णपणे शुद्धीवर नसल्याने तिचा जबाब होऊ शकला नाही. 
 
मैत्रिणीचा वाढदिवसच नव्हता! 
सूत्रांनी सांगितले, की ज्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला पीडित मुलगी घरी सांगून गेली, त्या मैत्रिणीचा त्या दिवशी वाढदिवसच नव्हता. त्या मैत्रिणीचा वाढदिवस सप्टेंबर महिन्यात असल्याची बाब समोर आली आहे. 
 
वॉर्डात येण्यास मज्जाव 
संवेदनशील प्रकरण असल्याने वॉर्डात तिच्या प्रकृतीविषयी चौकशी करणारांना; तसेच तेथे तिच्या पालकांनाही भेटण्यास पत्रकारांना मज्जाव करण्यात आला असून, डॉक्‍टर अधिक दक्षता घेत आहेत. 

सूत्रांनी सांगितला घटनाक्रम 

  • सात जुलैला अत्याचाराच्या दिवशी मैत्रिणीचा वाढदिवस असल्याचे सांगून ती सकाळी दहाला निघाली. 
  • रात्री साडेदहाला घरी पोचली. 
  • चार दिवस ती घरातच पडून होती. 
  • पाचव्या दिवशी कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले. 
  • तिला अंधूक दिसत असल्याने डोळ्याच्या डॉक्‍टरांना दाखविण्याचा सल्ला दिला गेला. 
  • सहाव्या दिवशी तिला चालताही येत नव्हते. 
  • 17 जुलैला वडिलांनी तिला गावी नेले. 
  • 18 जुलैला थोड्याशा उपचारानंतर ती बोलू लागली. 
  •  25 जुलैला पुन्हा प्रकृती बिघडल्याने घाटी रुग्णालयात दाखल, उपचार सुरू. 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Gang rape case flauwup