बागडेंची वयाच्या निकषावर मात ; फुलंब्री मतदारसंघातून मिळाली उमेदवारी

प्रकाश बनकर
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

ल्या दीड ते दोन महिन्यापासून बागडे यांचे तिकिट कापले जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. दोन दिवसापुर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत खराब कामगिरी असलेल्या 25 विद्यमान आमदारांचे तिकिट कापले जाणार आहे.

औरंगाबाद : वयाच्या निकषामुळे विधाधनसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. 75 वर्षाच्या निकषावर मात करत हरिभाऊ बागडे यांना फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविली. त्यामुळे त्यांच्या उमेदवारी विषय असलेला सस्पेन्स सुद्धा संपला आहे. भाजपने जाहिर केलेल्या पहिल्या यादीत बागडे यांना फुलंब्री मतदारसंघातून उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. त्यामुळे याच मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांच्या इच्छेवर पाणी फेरले गेले. 

गेल्या दीड ते दोन महिन्यापासून बागडे यांचे तिकिट कापले जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. दोन दिवसापुर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत खराब कामगिरी असलेल्या 25 विद्यमान आमदारांचे तिकिट कापले जाणार आहे.

तसेच वयाची 75 पार केलेल्यांनाही घरी बसविणार असल्याचे सांगितले होते.मात्र या निकाषांत बसूनही विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर पुन्हा पक्षाने विश्‍वास दाखवत उमेदवारी जाहिर केली. 30 वर्षांपेक्षा जास्त राजकिय प्रवास. जनसंघ ते राष्ट्रीय सेवा संघ यांच्यात पुर्णवेळ काम करणारे निष्ठावंतापैकी बागडे एक आहे. वयाची अट जरी पक्षानी लावली असली तरी पक्षनिष्ठा फळला आली. आणि बागडे यांना तिकिट मिळाले. 

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. तेव्हा फुलंब्री मतदारसंघातून बागडे यांच्यासह अनुराधा चव्हाण, उपमहापौर विजय औताडे, भगवान घडामोडे, प्रदीप पाटील, सुहास सिरसाट यांनी मुलाखती दिल्या होत्या. यातील सर्वांनी विधानसभेची तयारीही सुरु केली होती. 

मंगळवारी जाहिर झालेल्या भाजपच्या यादीत फुलंब्री मतदारसंघातून नव्या चेहऱ्यांला संधी मिळेल अशी अपेक्षा होती.मात्र पक्षांनी जुने जानते पक्षनिष्ठ हरिभाऊ बागडे यांच्यावर विश्‍वास दाखवत पुन्हा एकदा संधी दिली आहेत. यामूळे इच्छुकांमध्ये नाराजीचा सुरु दिसून आला आहे. बागडे यांना तिकिट मिळाल्यामूळे इच्छुका काय भूमिका घेतात. याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about haribhau bagade