Vidhan Sabha 2019 : कोणत्याही पक्षात प्रवेश नाही; शिवस्वराज्य लढवणार कन्नडसह 'या' पाच जागा

अनिल जमधडे
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

औरंगाबाद,  : आगामी विधानसभा निवडणुकीत शिवस्वराज्य बहुजन पक्ष जिल्ह्यातील सहा विधानसभेच्या जागा लढवणार असल्याची माहिती पक्षाचे प्रमुख तथा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी (ता. 16) पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयामुळे जाधव हे अन्य पक्षात जाणार अल्याच्या शक्‍यतेला पूर्णविराम मिळाला आहे. 

औरंगाबाद,  : आगामी विधानसभा निवडणुकीत शिवस्वराज्य बहुजन पक्ष जिल्ह्यातील सहा विधानसभेच्या जागा लढवणार असल्याची माहिती पक्षाचे प्रमुख तथा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी (ता. 16) पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयामुळे जाधव हे अन्य पक्षात जाणार अल्याच्या शक्‍यतेला पूर्णविराम मिळाला आहे. 

जाधव म्हणाले, ""शिवस्वराज्य बहुजन पक्षाने कुठल्यातरी राजकीय पक्षासोबत जावे असे मत काही कार्यकर्त्यांचे होते. त्यानुसार शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपशी चर्चा सुरू होती; पण ज्या उद्देशाने मी स्वःताचा शिवस्वराज्य बहुजन पक्ष काढला होता, तो बाजूला ठेवून राजकीय स्वार्थासाठी एखाद्या पक्षात जावे हे माझ्या मनाला पटत नव्हते आणि म्हणूनच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्वःताच्या ताकदीवर उमेदवार उभे करणार आहे'', असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील जनतेने मला 2 लाख 83 हजार हजार इतके मतदान केले. राज्यभरात पहिल्यांदाच अपक्ष उमेदवाराला एवढी मते मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. जाधव राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती; मात्र आता या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. 

अन्य पक्षाबरोबर युती नाही 
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर-खुल्ताबाद, वैजापूर, कन्नड आणि शहरी भागातील पूर्व, मध्य, पश्‍चिम या सर्व विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत अपल्याला लक्षवेधी मते मिळाली होती. गंगापूर-खुल्ताबादमध्ये तर सध्याच्या आमदारांना तेव्हा जितकी मते मिळाली होती, त्यापेक्षा जास्त मते मिळाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील किमान चार मतदारसंघात माझ्या पक्षाच्या उमेदवारांना यश मिळेल असा दावा त्यांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about harshwardhan jadhav