छताचा टवका पडला, निरीक्षकाला आले टेंगूळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

समाज कल्याण सभापतींच्या दालनात करण्यात काम सुरु असताना समाज कल्याण निरीक्षकांच्या डोक्‍यावर प्लास्टरची पट्टीचा मोठा तुकडा पडल्याने मुका मार लागला. यात त्यांच्या डोक्‍याला टेंगूळ आले. 

औरंगाबाद : जिल्हा परिषदेतील तीन विषय समित्यांच्या सभापतींच्या दालनांचे छत कमकुवत झाल्याने त्यांच्या दालनात पाणी टपकत आहे. दरम्यान समाज कल्याण सभापतींच्या दालनात करण्यात काम सुरु असताना समाज कल्याण निरीक्षकांच्या डोक्‍यावर प्लास्टरची पट्टीचा मोठा तुकडा पडल्याने मुका मार लागला. यात त्यांच्या डोक्‍याला टेंगूळ आले. 

महिला व बाल कल्याण सभापतींच्या कर्मचाऱ्यांचे दालन, वित्त व बांधकाम समिती सभापती दालन आणि समाज कल्याण सभापतींच्या दालनांचे छतात पाणी मुरल्यामुळे काही ठिकाणी पाणी टपकत आहे. यामुळे छतांना वाटरप्रूफ करण्याचे काम सुरु आहे. शुक्रवारी (ता.नउ) दुपारी दोन अडीच वाजेच्या सुमारास समाज कल्याण सभापती धनराज बेडवाल यांच्या दालनाच्या छतावर वॉटरप्रुफींगचे काम सुरु होते.

कामगार छतावर काम करत असताना बेडवाल यांच्या दालनात स्विय सहाय्यक बसतात त्या ठिकाणी आतमधून केलेले प्लास्टर, विटा, माती पडले. होल्डरसह वीजेचा बल्बही पडले. नेमके याच वेळी समाज कल्याणच्या एक महिला निरीक्षक दालनात जात होत्या. त्यांच्या डोक्‍यावरच हे पडल्याने त्यांना जोराचा मुका मार लागला आणि त्यांच्या डोक्‍याला टेंगूळ आल्याचे त्यांनी सांगीतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about Head Bump