कोरेगाव भीमा स्मृती स्तंभाला महापालिकेत आडकाठी 

Aurangabad Municipal
Aurangabad Municipal

औरंगाबाद - भावसिंगपुरा भागात कोरेगाव भीमा स्मृती स्तंभ उभारण्याचा निर्णय महापालिकेने तीन वर्षांपूर्वी घेतला आहे. त्यानुसार निविदा प्रक्रियाही अंतिम करण्यात आली; मात्र या कामाला प्रशासनातर्फे आडकाठी घातली जात असून, पोलिसांनी आक्षेप घेतल्याचे कारण आता समोर करण्यात येत आहे. त्यामुळे वॉर्डाच्या नगरसेविका आशा निकाळजे यांच्यासह नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

महापालिकेची भीमनगर-भावसिंगपुरा भागात सात एकर जागा आरक्षित आहे. त्यातील काही जागांवर उद्यान विकसित करून कोरेगाव भीमा स्तंभ उभारण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला; मात्र केवळ निविदा प्रक्रियेतच तीन वर्षे गेली. निविदा अंतिम टप्प्यात असताना प्रशासनातर्फे मात्र आडकाठी घातली जात आहे. बुधवारी (ता. सहा) झालेल्या सर्वसाधारण सभेत श्रीमती निकाळजे यांनी हे काम का केले जात नाही, असा प्रश्‍न केला. नगरसेवक कैलास गायकवाड यांनीही तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी केली. त्यावर पोलिस व जिल्हाधिकाऱ्यांनी स्मृती स्तभांवर आक्षेप घेतला असल्याचे सांगितले. माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी स्तंभ उभारण्याची प्रक्रिया निविदेपर्यंत आली आहे. त्या वेळी स्तंभ उभारण्याचा निर्णय झाला त्या वेळीच प्रशासनाने पोलिस, जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पुढील प्रक्रिया करणे गरजेचे होते, असे मत मांडले. 

परवानगीच्या अधीन राहून काम सुरू करा 
पोलिस, जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीच्या अधीन राहून हे काम सुरू करण्यासाठी प्रशासनाने पुढील प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले. त्यावर इतर नगरसेवकांनी फक्त स्मृती स्तंभाला पोलिसांच्या परवानगीची गरज काय? असा प्रश्‍न केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com