महावितरणच्या प्रादेशिक सहव्यवस्थापकीय संचालकपदी राहुल रेखावार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

महावितरणच्या प्रादेशिक सहव्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे सोमवारी (ता. 22) राहुल रेखावार यांनी स्वीकारली. त्यानंतर पहिल्याच दिवशी संपूर्ण विभागाला भेट देऊन कार्यालयाचा आढावा घेत अनेक सूचना केल्या. येत्या काळात यंत्रणेत सुधारणा करून अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

औरंगाबाद - महावितरणच्या प्रादेशिक सहव्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे सोमवारी (ता. 22) राहुल रेखावार यांनी स्वीकारली. त्यानंतर पहिल्याच दिवशी संपूर्ण विभागाला भेट देऊन कार्यालयाचा आढावा घेत अनेक सूचना केल्या. येत्या काळात यंत्रणेत सुधारणा करून अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

नांदेड जिल्ह्यातील रेखावार हे वर्ष 2011 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी परभणी येथे महापालिकेत आयुक्त म्हणून आणि हिंगोली जिल्हा परिषद येथे मुख्य
कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले आहे. त्यांनतर धुळे येथे जिल्हाधिकारी म्हणून सव्वा वर्ष कार्यकाळानंतर ते शहरात रुजू झाले आहेत. 

यापूर्वी ओमप्रकाश बकोरिया यांची पुणे येथे क्रीडा आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. वीज ग्राहकांना दर्जेदार, सुरळीत व अखंडित सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगून वीजचोरीवर नियंत्रण आणणे, थकबाकी वसुलीत वाढ करणे, नवीन ग्राहकांना वीजजोडण्या देणे, उघोगांना अखंडित वीजपुरवठा करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, ग्राहक सेवा चांगली देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about MahaVitaran's regional co-director