शाळा बंद; पण विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू

News about Online teaching
News about Online teaching

येरमाळा (जि. उस्मानाबाद) - कोरोनाच्या साथीमुळे शाळा बंद आहेत; पण या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी मासोबाचीवाडी (ता. वाशी) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दत्तात्रय शंकर डांगे हे ‘शाळा बंद; पण शिक्षण सुरू’ या उपक्रमाअंतर्गत ऑनलाइन वर्ग भरवीत आहेत. त्याला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

मासोबाचीवाडी हे गाव बालाघाटाच्या डोंगरदऱ्यांत वसलेले आहे. चोहूबाजूंनी उंच डोंगर, येण्या-जाण्यासाठी वाहनांची सोय नाही. दळणवळणाचे साधन नाही. गावात पाहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून, २८ विद्यार्थी आहेत.

शाळेत ऊर्मिला पिसाळ आणि दत्तात्रय डांगे (रा. चारे, ता. बार्शी) दे दोन शिक्षक आहेत. चार महिन्यांपासून शाळेचा दिनक्रम विस्कळित झाला. त्यामुळे शिक्षक डांगे यांनी पालकांचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले; मात्र काही पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मोबाईलही नाही. अशांसाठी डांगे यांनी शिक्षणप्रेमी युवक-युवतींच्या सहकार्याने मुलांच्या शिक्षणाचे काम सुरू केले आहे. या माध्यमातून डांगे विद्यार्थ्यांना रोज शिकवीत आहेत. त्यांना गृहपाठही दिला जात आहे. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा
  
वेळही ठरलेली 
एका ग्रुपमध्ये चार विद्यार्थी आहेत. असे त्यांनी एकूण सात ग्रुप केले आहेत. प्रत्येक ग्रुपला वेगवेगळी वेळ दिलेली आहे. त्याआधारे पंधरा दिवसांपासून त्यांना शिक्षण दिले जात आहे. या उपक्रमाचे पालक, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमींतून कौतुक होत आहे. 

(संपादन : विकास देशमुख) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com