एकांकिका महोत्सवाला जोरदार प्रतिसाद

उस्मानाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपपरिसरातील एकांकिका महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी काकासाहेब शिंदे, प्रा. डॉ. गोविंद काळे, प्रा. संभाजी भोसले, नितीन तावडे, रवींद्र केसकर, डॉ. मिलिंद माने आदी.
उस्मानाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपपरिसरातील एकांकिका महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी काकासाहेब शिंदे, प्रा. डॉ. गोविंद काळे, प्रा. संभाजी भोसले, नितीन तावडे, रवींद्र केसकर, डॉ. मिलिंद माने आदी.

उस्मानाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या येथील उपपरिसरातील एकांकिका महोत्सवाचा रविवारी (ता. एक) समारोप झाला. ‘त्याची कहाणी’ हा एकपात्री प्रयोग, लोककलेतील आधुनिक कीर्तन आणि वासुदेव या कलाप्रकारांनी अखेरचे सत्र गाजले.

विद्यापीठाच्या उपपरिसरात यंदा पहिल्यांदाच नाट्यशास्त्र विभाग सुरू झाला आहे. त्यानिमित्ताने उपपरिसरात प्रथमच दोनदिवसीय एकांकिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी नामांकित एकांकिका सादर झाल्या. उपस्थितांची जोरदार दाद मिळाली. समारोपप्रसंगी उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ. प्रशांत दीक्षित, अधिसभा सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आदी उपस्थित होते. पुढील वर्षी हा विभाग अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जातील, असा विश्‍वास डॉ. काळे यांनी व्यक्त केला.

नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्यामागची भूमिका प्रा. संभाजी भोसले यांनी मांडली. विद्यार्थीदशेत असताना हा विभाग इथे असणे अपेक्षित होते, अशी खंत ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष रवींद्र केसकर यांनी व्यक्त केली. आता सुरू झालेल्या या विभागाच्या वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ रंगकर्मी काकासाहेब शिंदे यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे, ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे आदी उपस्थित होते.

एकांकिका महोत्सव यशस्वितेसाठी सहकार्य लाभलेल्या कर्मचाऱ्यांचा विभागप्रमुख डॉ. मिलिंद माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. गहिनीनाथ वळेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संतोष गालफाडे यांनी यासाठी सहकार्य केले. उपपरिसरातील विद्यार्थी, प्राध्यापक, शहरातील नाट्यप्रेमी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com