नॅचरल उद्योग समूहाकडून लवकरच सॅनिटायझरचे उत्पादन

File photo
File photo

शिराढोण (जि. उस्मानाबाद) : अन्न व औषध, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिल्याने नॅचरल उद्योग समूह लवकरच प्रतिदिन १० हजार लिटर सॅनिटायझरचे उत्पादन करणार आहे, अशी माहिती नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर अत्यावश्यक आहे. ग्राहकांना मुबलक प्रमाणात व योग्य दरात हे सॅनिटायझर मिळावे, या उद्देशाने राज्य सरकारने आसवानी प्रकल्प असलेल्या उद्योगांना सॅनिटायझर उत्पादनाची परवानगी दिली आहे.

औरंगाबाद विभागाचे अन्न व औषधी विभागाचे आयुक्त संजय काळे, राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप, अधीक्षक केशव राऊत यांनी सॅनिटायझर उत्पादन करण्यासाठी परवाना दिला असून, आसवानी प्रकल्पाच्या माध्यमातून आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून सॅनिटायझर उत्पादन करण्यासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध करून लवकरच प्रतिदिन १० हजार लिटर सॅनिटायझर उत्पादन करण्यात येणार आहे. प्रारंभी अर्धा, एक, दोन, पाच लिटर तसेच दोनशे लिटरच्या पॅकिंगमध्ये बाजारात उपलब्ध होईल, अशी माहिती अध्यक्ष ठोंबरे यांनी दिली. 

दरम्यान, गौरगाव (ता. कळंब) येथील ॲडलर्स बायो एनर्जी प्रतिदिन दोन हजार लिटर सॅनिटायझरचे उत्पादन करणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक सचिन वैद्य यांनी दिली. यासाठी परवाना मिळाला आहे. आसवानी प्रकल्पाच्या माध्यमातून आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून व सॅनिटायझर उत्पादन करण्यासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध करून लवकरच प्रतिदिन दोन हजार लिटर सॅनिटायझरचे उत्पादन करण्यात येणार आहे.

प्रारंभी ९० मिलिलिटर, २०० मिलिलिटर, अर्धा लिटर तसेच एक लिटरच्या पँकिंगमध्ये हे सॅनिटायझर बाजारात उपलब्ध होईल. कारखान्याचे अध्यक्ष सदानंद बापट यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक सचिन वैद्य यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com