दुचाकीवरुन फिरणाऱ्यांची महिला पोलिस कर्मचाऱ्याकडून धूलाई

उमरगा : दुचाकीवरुन फिरणाऱ्यांवर पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली.
उमरगा : दुचाकीवरुन फिरणाऱ्यांवर पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. पोलिस यंत्रणा दिवस, रात्र काम करून लोकांच्या सुरक्षिततेसाठी तैनात आहे. जनजागृती करीत घराबाहेर पडू नका असे आवाहन करीत पोलिस गस्त घालत असतानाही काही जण घराबाहेर पडत आहे. महामार्गावर दुचाकीने फिरणाऱ्या काही तरुणांची पोलिसांनी गुरुवारी (ता. दोन) चांगलीच धूलाई केली. तेही महिला कर्मचाऱ्यांकडून.

कोरोनाचा संसर्ग गर्दीच्या ठिकाणी, एकमेकाच्या संपर्कातून वाढतो. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून शहरासह ग्रामीण भागात जनजागृती सुरू आहे. पोलिसांचे संख्याबळ कमी असतानाही कर्मचारी चोवीस तास ड्यूटी करताहेत. शहरात महसूल, पालिका प्रशासन व व्यापारी महासंघाकडून दररोज जनजागृती सुरू असतानाही रस्त्याने दूचाकी व चारचाकी वाहनातून मेडिकल, भाजी, किराणा साहित्य खरेदीचा बहाना करून नागरिक वावरतानाचे चित्र दिसत आहे. प्रेमाने, कळकळीची विनंती करूनही काही लोकांना गांभिर्य लक्षात येत नसल्याने पोलिस प्रशासनाने हातात दंडूका घेण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

गुरूवारी सकाळी अकरा वाजता उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले यांनी तीन वाहनचालकांना ठाण्यात आणले. पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले यांनी कर्मचाऱ्यांचे पथक नेमून राष्ट्रीय महामार्गावरून विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारावर कारवाई सुरू केली. पोलिस उपनिरीक्षक अमोल मालुसूरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी दुपारी तीनपर्यंत कारवाईची मोहिम सुरू ठेवली होती, काही तरूणांना उठबश्याची अन्‌ डांबरी रस्त्यावर बसण्याची शिक्षा दिली जात होती.

विशेषतः महिला कर्मचाऱ्यांकडून काठीचा प्रसाद दिल्याने रस्त्याने बिनकामी फिरणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे. दरम्यान पोलिसांनी सात दूचाकी जप्त केल्या असून, या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उशीरापर्यंत आणखी काही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्री. गुंडिले यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com