esakal | मजुरांना विलगीकरण कक्ष, मात्र श्रीमंतांना दुसरा न्याय
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

लातूर जिल्ह्यात आढळून आलेल्या त्या कोरोणाबाधीत आठ जणांनी उस्मानाबाद जिल्ह्यातून प्रवास केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. शिवाय त्यांनी येथील तहसील कार्यालयात जावून अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढचा प्रवास केला. एकीकडे ऊसतोड मजुरांना कळंब शहरात विलगीकरण कक्षात ठेवले जाते. मात्र चारचाकी वाहनातून आलेल्यांना सोडून दिले जाते. गरीबांना एक न्याय अन् श्रीमंतांना दुसरा न्याय कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मजुरांना विलगीकरण कक्ष, मात्र श्रीमंतांना दुसरा न्याय

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीबांना एक अन्‌ श्रीमंतांना दुसरा न्याय का?, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. लातूर जिल्ह्यात आढळून आलेल्या त्या कोरोणाबाधीत आठ जणांनी उस्मानाबाद जिल्ह्यातून प्रवास केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. शिवाय त्यांनी येथील तहसील कार्यालयात जावून अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढचा प्रवास केला. एकीकडे ऊसतोड मजुरांना कळंब शहरात विलगीकरण कक्षात ठेवले जाते. मात्र चारचाकी वाहनातून आलेल्यांना सोडून दिले जाते. गरीबांना एक न्याय अन् श्रीमंतांना दुसरा न्याय कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा कठीणप्रसंगी असा भेदभाव नसावा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

कोरोणाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात विविध उपयोजना केल्या जात आहेत. राज्य शासनाने संचारबंदी लागू केल्यानंतर प्रत्येक शहरात नाकाबंदी सुरू आहे. अत्यावशक सेवेची वाहने वगळून सर्वच जणांना फिरण्यास बंदी करण्यात आली आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

वाहने तपासून पुढे सोडली जातात. तरीही ते आठ जण ३१ मार्चला उस्मानाबाद शहरात चारचाकी वाहनातून आले. त्यांच्याकडे दोन चारचाकी वाहने होती. शहरात आल्यानंतर येथील काही नागरिकांनी त्यांना मदतीचा हात ही दिला. एवढेच नव्हे तर एका ढाब्यावर आश्रय ही दिला.

ढाबा मालकाला बोलावून त्यांच्या जेवणाची सोय केली. त्यानंतर एक एप्रिलला त्या आठ जणांनी तहसील कार्यालय गाठले. तेथे शहरातील काही नागरिक उपस्थित होते. तहसीलचे अधिकारी, पोलिस अधिकारी आणि दिल्लीहून आलेले ते आठ जण यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यानंतर त्या आठ जणांना पुढे जाण्यास परवानगी देण्यात आली.

कोणत्या नियमाने अधिकाऱ्यांनी त्या आठ जणांना सोडून दिले. दरम्यान आता मात्र आपणही त्यांच्या संपर्कात आल्याचे समजताच काही अधिकाऱ्यांनी, शहरातील त्या नागरिकांनी स्वतःची स्वॅब टेस्ट करून घेतल्याची खमंग चर्चा आहे.