नियम मोडता, काढा ऊठबश्या

लोहारा : मास्कचा वापर न करता शहरात बेफिकिरीने वावरणाऱ्या तरुणाला ऊठबश्यांची शिक्षा देताना पोलिस
लोहारा : मास्कचा वापर न करता शहरात बेफिकिरीने वावरणाऱ्या तरुणाला ऊठबश्यांची शिक्षा देताना पोलिस

लोहारा (जि. उस्मानाबाद) : कोरोना संसर्गजन्य विषाणूचा फैलाव होत असतानाही तोंडाला मास्क किंवा रुमाल न बांधता शहरात फिरणाऱ्या तरुणांना पोलिस ऊठबश्यांची शिक्षा करून त्यांच्या अंगातील शर्ट काढून तोंडाला बांधायला सांगत असल्याचे चित्र शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाहायला मिळाले.

कोरोना संसर्गजन्य विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वत्र देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यातच तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य विभागा, महसूल विभाग, पोलिस प्रशासन ॲलर्ट झाले आहे. कोरोनाचा फैलाव तालुक्यात होऊ नये, यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यासह तालुक्यात जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही नाकाबंदी करण्यात आली असून २४ तास पोलिसांचा खडा पहारा या ठिकाणी आहे. अत्यावश्यक काम असेल तरच कुटुंबातील एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे, सर्वांनी मास्कचा वापर करून सुरक्षितता बाळगण्याबाबत आवाहन नागरिकांना करण्यात येत असतानाही काही नागरिक, युवक बेफिकिरीने वागताना दिसून येत आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

किराणा, दूध, मेडिसीन आणण्याच्या बहाण्याने मास्क न लावता घराबाहेर पडताना तरुण दिसत आहेत. दुचाकीवरून फिरणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. त्यात अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर इतर वाहनांना पेट्रोल, डिझेल देणे बंद केले असताना मोकाट फिरणाऱ्यांच्या दुचाकीला पेट्रोल मिळतेच कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता दुचाकीवरून मोकाट फिरणाऱ्या व मास्क न वापरणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे.

स्वत:ची काळजी घेण्याबाबत उदासीन असलेल्या व तोंडाला मास्क किंवा रुमाल न बांधत फिरणाऱ्यांना पोलिसांकडून चांगलीत अद्दल घडविली जात आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मास्क न लावता फिरणाऱ्या तरुणांना ऊठबश्या करण्याची शिक्षा केली जात आहे. त्यानंतर त्यांच्या अंगावरील शर्ट काढून तोंडाला बांधण्यास भाग पाले जात असल्याचे चित्र आज दिवसभर पाहायला मिळाले. पोलिसांकडून शिक्षा होत असल्याने चौकाचौकांत विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com