अन्नछत्रात दानशूर शेतकऱ्याच्या हस्ते केळी वाटप

तुळजापूर : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या अन्नछत्रात गरजूंना अन्नाचे पॉकेट व केळीचे वाटप करताना रामलिंग पटाडे. या वेळी आमदार पाटील आदी.
तुळजापूर : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या अन्नछत्रात गरजूंना अन्नाचे पॉकेट व केळीचे वाटप करताना रामलिंग पटाडे. या वेळी आमदार पाटील आदी.

उस्मानाबाद : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सात दिवसांपासून तुळजापूर येथे उभारण्यात आलेल्या अन्नछत्रात मंगळवारी (ता. सात) दानशूर शेतकरी विकास पटाडे यांच्या हस्ते गरजूंना अन्नाचे पॉकेट व केळीचे वाटप करण्यात आले.

अन्नछत्राच्या माध्यमातून ४०० गरजूंना दररोज अन्नदान करण्यात येते. गरजूंच्या घरापर्यंत अन्नाचे पॉकेट पोचविण्याची सोयही करण्यात आली आहे. या काळात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी, डॉक्टर, नगरपरिषद कर्मचाऱ्यांनाही जेवण पुरविण्याची सोय केली आहे. हे अन्नछत्र चालविण्यासाठी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोद गंगणे, आनंद कंदले यांनी पुढाकार घेतला आहे.

विजय कंदले, बाळासाहेब शिंदे, बापू कणे, पंडित जगदाळे, विशाल रोचकरी, विनोद पलंगे, नानासाहेब लोंढे, नागेश नाईक, अभिजित कदम, संतोष परमेश्वर, सोन्या भिंगारे, श्रीनाथ शिंदे, महेश गुंड, हनुमंत पुजारी, समाधान जगताप, प्रकाश मगर, रत्नदीप भोसले, अंबरीश जाधव, नानासाहेब साळुंखे आदी त्यांना सहकार्य करीत आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

लॉकडाऊनच्या काळात गोर-गरीब, गरजू लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, त्यांचे हाल होऊ नये म्हणून कामठा (ता. तुळजापूर) येथील शेतकरी विकास रामलिंग पटाडे यांनी त्यांच्या दोन एकरातील केळीच्या बागेतील काढणीला आलेली केळी सरकारने काढून नेत गरजूंना देऊन त्यांची भूक भागवावी, असे आवाहन केले होते. या अनुषंगाने आमदार पाटील यांनी श्री. पटाडे यांचे कौतुक केले, तसेच नगराध्यक्ष रोचकरी यांना त्यांच्या शेतातील केळी घेऊन गोरगरिबांना वाटप करण्यासाठीचे नियोजन करण्याबाबत सूचना केली होती.

त्यानुसार नगराध्यक्ष रोचकरी यांनी श्री. पटाडे यांच्या शेतातील ११० कॅरेट केळी आणून तुळजापूर येथील जावेद बागवान यांच्याकडे पिकविण्यासाठी दिली. कोणतेही शुल्क न आकारता श्री. बागवान यांनी सर्व केळी पिकवून दिली. या प्रक्रियेमध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. केळी पिकल्यानंतर मंगळवारी यातील २० कॅरेट तुळजापूर येथील अन्नछत्रामध्ये गरजू लोकांना वाटप करण्यात आलेतर उर्वरित केळी तालुक्यातील विविध गावांत वाटप करण्यात आले. आदर्श काम करणारे दानशूर शेतकरी विकास पटाडे यांच्याच हस्ते अन्नछत्रामध्ये मंगळवारी अन्नधान्य व केळीचे वाटप करण्यात आले.

आमदार पाटील, तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी पी. पी. मरोड, नगराध्यक्ष रोचकरी, विजय कंदले, बाळासाहेब शिंदे, विनोद (पिटू) गंगणे, आनंद कंदले, विशाल रोचकरी, पिंटू मुळे, पंडित जगदाळे, अभिजित कदम आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com