टॅंकरच्या पाण्याने केली सर्जा-राजाची खांदेमळणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

गतवर्षीप्रमाणे यंदाही पावसाने ओढ दिली. ऑगस्ट महिना संपत आला असतानाही अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अशा परिस्थितीत आलेल्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट आहे.

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : गतवर्षीप्रमाणे यंदाही पावसाने ओढ दिली. ऑगस्ट महिना संपत आला असतानाही अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अशा परिस्थितीत आलेल्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट आहे. तालुक्‍यातील वडगाव (काटी) येथील शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. 29) टॅंकरने पाणी आणून बैलांची खांदेमळणी केली.

तालुक्‍यात भयावह दुष्काळी परिस्थिती आहे. दमदार पावसाअभावी विहिरी, नाले, ओढ्यांना पाणी आलेले नाही. पाणीटंचाईमुळे शेतकरी हैराण झाला आहे. विहिरीत पाणी नसल्यामुळे बैल धुण्याचा मोठा प्रश्न पाण्याअभावी शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेला आहे.

वडगाव (काटी) येथील काही शेतकऱ्यांनी सात किलोमीटरवरून पाणी आणून गुरुवारी बैल धुतले. तालुक्‍यात अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. दरम्यान, तालुक्‍यात पोळ्याच्या सणावर दुष्काळाचे सावट आहे. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे उडीद, मूग ही पिके हातात आलेली नाहीत. मूग पिकावर मावासारख्या रोगाचा फैलाव झाला आहे. शेतकऱ्यांकडे पैसा नसल्यामुळे बाजारपेठेतही व्यवसायामध्ये घट झालेली आहे. 

माझ्याकडे सात जनावरे आहेत. दोन बैल आणि पाच जनावरांचा समावेश आहे. पोळ्याच्या सणाला बैल धुण्यासाठी पाणी नाही. तामलवाडी येथून टॅंकरने पाणी आणून बैलांची खांदेमळणी केली. शेतीतून उत्पन्न मिळण्याची आशा अजिबात नाही. 
- विलास गुंड, शेतकरी, वडगाव (काटी). 

पोळ्याच्या निमित्ताने बाजारात ग्राहकी मंदावली आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांकडे पैसाच नाही. अशा परिस्थितीत शेतकरी पोळा सण साजरा करण्यासाठी किती खर्च करणार, असा प्रश्न आहे. पर्यायाने आमच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. 
- समाधान चौगुले, व्यापारी, पिंपळा (बुद्रुक). 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Pola festivalतुळजापूर, ता. 29 (बातमीदार) ः गतवर्षीप्रमाणे यंदाही पावसाने ओढ दिली. ऑगस्ट महिना संपत आला असतानाही अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अशा परिस्थितीत आलेल्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट आहे. तालुक्‍यातील वडगाव (काटी) येथील शेतक