रेल्वेच धडकेत मुंडके गायब, धड सापडले, हातही तुटले

अनिल जमधडे
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ अनोळखी व्यक्तीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. त्याचे शिर बेपत्ता झाल्याने त्याची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. 

औरंगाबाद ते मुकुंवाडी स्थानकादरम्यान संग्रामनगर रेल्वे रुळाजवळ मंगळवारी (ता. 15) अंदाजे 30 वर्षीय तरुणाचा रेल्वेखाली सापडल्याने मृत्यू झाला; मात्र या धडकेत तरुणाचे शिर उडून गेले. त्याचप्रमाणे दोन्ही हात कोपरापासून तुटून पडले आहेत. केवळ धड सापडले. शिर सापडले नसल्याने पोलिसांसमोर तरुणाची ओळख पटवण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

अंगात काळ्या रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट, काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली आहे. आकाशी रंगाची अंडरवेअर, कंबरेला पिवळ्या रंगाचा बेल्ट आहे. सडपातळ बांधा असलेल्या या तरुणाची माहिती मिळाल्यास जवाहरनगर पोलिस ठाण्याशी (क्र. 02402240556) यावर संपर्क साधावा, असे आवाहन जमादार एस. जे. दाभाडे यांनी केले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about railway