कोल्हापूर धनबादचे इंजिन फेल, चार रेल्वे गाड्यांचा खोळंबा

file photo
file photo

औरंगाबाद,  : कोल्हापूर-धनबाद रेल्वेचे इंजिन बंद पडल्याने तब्बल चार रेल्वेगाड्यांचा खोळंबा झाला. जवळपास दोन तास रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. 
दक्षिण मध्य रेल्वेच्या नियोजन शून्य कारभाराने मराठवाड्यातील प्रवासी अक्षरश: त्रस्त झाले आहेत. सातत्याने इंजिनमध्ये होणाऱ्या बिघाडाच्या घटना वाढत असल्याने रेल्वेच्या विरोधात जनप्रक्षोभ उफाळून येत आहे. शुक्रवारी (ता. 11) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास कोल्हापूर-धनबाद एक्‍स्प्रेस रेल्वेगाडी शहानुरमिया दर्गाच्या (संग्रामनगर) पुढे रेल्वे गेट क्र. 53, 54 जवळ येताच इंजिन बंद झाले. इंजिनचे पॉवर फेल झाल्याने रेल्वेगाडी जागेवर थांबली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या समोर आणि पाठीमागे अशा दोन्ही बाजूने फटाक्‍यांचा आवाज केला.

रेल्वे इंजिन मध्येच बंद पडल्याने रेल्वे प्रशासनाने शिवाजीगर आणि एमआयटी जवळील रेल्वे गेट बंद केले त्यामुळे रेल्वेसेवेबरोबरच वाहतुकीचाही खोळंबा झाला. तब्बल अर्ध्या तासानंतर रेल्वे गेट उघडण्यात आल्यानंतर रस्त्यावरील वाहतुक सुरळीत झाली. असे असले तरीही रेल्वे मध्येच थांबल्याने औरंगाबाद-नांदेड, मराठवाडा एक्‍स्प्रेस, तोडोबा एक्‍स्प्रेस, नांदेड-औरंगाबाद इंटरसिटी एक्‍स्प्रेस अशा चार रेल्वे गाड्यांचा खोळंबा झाला. तब्बल दोन तासानंतर चिकलठाणा येथील उभ्या असलेल्या मालगाडीचे इंजिन बंद पडलेल्या धनबादला लावण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर रेल्वेची वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. या प्रकारामुळे चारही रेल्वेच्या हजारो प्रवाशांना जवळपास दोन तासाचा खोळंबा झाला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com