वाहनांच्या हाय सिक्‍युरिटी  नंबरप्लेटचे त्रांगडे, वितरकांकडून होतोय विलंब 

अनिल जमधडे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

औरंगाबाद : वाहनांची सुरक्षा आणि गैरप्रकारांना आळा बसावा, या प्रमुख उद्देशाने 1 एप्रिल 2019 नंतरच्या वाहनांसाठी हाय सिक्‍युरिटी नंबरप्लेट बंधनकारक केली आहे. मात्र उत्पादकांकडून नंबरप्लेट देण्यासाठी आठ ते पंधरा दिवसांचा वेळ लागत असल्याने शहरात सर्रास विनाक्रमांक नवीन वाहने रस्त्यावर फिरत आहेत. 

औरंगाबाद : वाहनांची सुरक्षा आणि गैरप्रकारांना आळा बसावा, या प्रमुख उद्देशाने 1 एप्रिल 2019 नंतरच्या वाहनांसाठी हाय सिक्‍युरिटी नंबरप्लेट बंधनकारक केली आहे. मात्र उत्पादकांकडून नंबरप्लेट देण्यासाठी आठ ते पंधरा दिवसांचा वेळ लागत असल्याने शहरात सर्रास विनाक्रमांक नवीन वाहने रस्त्यावर फिरत आहेत. 

वाहन उत्पादकांकडून एप्रिल 2019 नंतर उत्पादित होणाऱ्या वाहनांवर डीलरमार्फत टेम्परप्रूफ हाय सिक्‍युरिटी नंबरप्लेट व परमनंट आयडेंटिफिकेशन नंबरसहित उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गेल्या वर्षी केंद्र शासनाने हाय सिक्‍युरिटी नंबरप्लेट अनिवार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हाय सिक्‍युरिटी नंबरप्लेटमुळे वाहनचोरीला आणि गैरप्रकारांना आळा बसणार आहे. शिवाय वाहनांवर "भाऊ', "दादा', "मामा', "काका' अशी अक्षरे तयार करून नंबरप्लेटवर लावणाऱ्या खऱ्या भाऊ, दादा, मामा यांना यानिमित्ताने चाप बसणार आहे. सर्व देशभरात एकाच पद्धतीच्या नंबरप्लेट वाहनांवर दिसणार आहेत. 

हेही वाचा : अखेर असा पकडला बिबट्या 

अशी आहे प्रक्रिया 

नवीन वाहन विक्री झाल्यानंतर त्याची आरटीओ निरीक्षकांमार्फत पाहणी (तपासणी) केली जाते. इंजिन व चेसिस क्रमांक आणि सर्व कागदपत्रे तपासली जातात. त्यानंतर निरीक्षक वाहन पासिंग करून देतात, वाहन पासिंग झाल्यानंतर डीलरकडून आरटीओ टॅक्‍स भरला जातो. त्यानंतर आरटीओ कार्यालय क्रमांक देते. क्रमांक मिळाल्यानंतर डीलर हाय सिक्‍युरिटी नंबर असलेली प्लेट वाहनधारकांना उपलब्ध करून देतो. मात्र वाहन खरेदीनंतर क्रमांक मिळेपर्यंतचा तीन ते पाच दिवसांचा वेळ जातो. नंबर मिळाल्यानंतर प्रत्यक्ष प्लेट मिळण्यासाठी पुन्हा आठ दिवसांपर्यंतचा वेळ जातो. म्हणून नवीन वाहन खरेदीनंतर नंबरप्लेट वेळेत मिळत नसल्याने वाहनधारक विनाक्रमांक सुसाट सुटले आहेत. 

येथे क्‍लिक करा : पंकजा मुंडे यांची पोस्ट, भावनिक आवाहन 

अशी आहे नंबरप्लेट 

हाय सिक्‍युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट्‌स अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविण्यात येत आहेत. या नंबरप्लेट्‌स टेम्परप्रूफ आहेत. एकदा हाय सिक्‍युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट्‌स वाहनांवर बसविल्या की त्या पुन्हा काढता येत नाहीत. मुख्य म्हणजे, एका विशिष्ट क्‍लिपद्वारे ही नंबरप्लेट वाहनांना लावण्यात येते. ही प्लेट ऍल्युमिनियमपासून तयार केलेली असून, नंबरप्लेटवर निळ्या रंगाच्या चक्राचे होलोग्राम आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने या नंबरप्लेटचा उपयोग होतो, असा परिवहन विभागाचा दावा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about rto