औरंगाबाद : बहिणीसोबत सेल्फी पोज; मिळे त्याला शाही भोज...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

'सकाळ माध्यम समूह' व 'शाही भोज रेस्टॉरंट' यांच्या वतीने बहीण-भावाच्या अतूट नात्यासाठी 'सेल्फी विथ सिस्टर' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

औरंगाबाद - बदलत्या काळानुसार रक्षाबंधनही हायटेक झाले आहे. मात्र, भारतीय संस्कृतीत अजून पारंपरिक सणांना मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. याच अनुषंगाने 'सकाळ माध्यम समूह' व 'शाही भोज रेस्टॉरंट' यांच्या वतीने बहीण-भावाच्या अतूट नात्यासाठी 'सेल्फी विथ सिस्टर' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी गुरुवारी (ता. 15) बहीण-भावाला राखी बांधत असतानाचा "सेल्फी' काढायचा आहे. तसेच तो सेल्फी स्वतःच्या फेसबूकवर अपलोड करावा. त्यानंतर या छायाचित्राला शनिवारपर्यंत (ता. 17) फेसबुकवर किती लाईक्‍स मिळाले, याचा स्क्रीनशॉट सोबत दिलेल्या ई-मेल अथवा व्हॉट्‌सअॅपवर पाठवायचा आहे. ज्या छायाचित्रांना सर्वात जास्त लाईक्‍स मिळाले आहेत; अशा प्रथम 25 विजेत्या बहिण-भावांना औरंगाबाद शहरातील सिडको बसस्थानकाजवळील नामांकित शाही भोज रेस्टॉरंटमध्ये शाही भोजथाळीचा आस्वाद दिला जाणार आहे. 
 
तुम्ही इतकंच करायचंय... 
 

  • भाऊ अथवा बहिणीसोबत सेल्फी काढून स्वतःच्या फेसबुकवर पोस्ट करावा. 
  • सेल्फीला कॅप्शन द्या #Sakalmarathwada व #ShahiBhojThali 
  • ज्या सेल्फी पोस्टला सर्वात जास्त लाईक्‍स असतील, त्यांना विजेता घोषित करण्यात येईल. 
  • फेसबुकवर अपलोड केलेल्या पोस्टचा (लाईक्‍ससह) स्क्रीनशॉट काढून तो "सकाळ'च्या व्हॉट्‌सऍप नंबरवर अथवा ई-मेलवर पाठवावा. 
  • विजेत्यांची नावे "सकाळ'मध्ये प्रकाशित करण्यात येतील. 

 
छायाचित्रे पाठविण्यासाठी... 
 

  • व्हॉट्‌सऍप नंबर : 8805459009 
  • ई-मेल : sanjaychikte@gmail.com 
  • पाठविण्याची अंतिम मुदत : 17 ऑगस्ट 2019 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Selfie with Sister Activities