स्मार्ट शहर बसचालक-वाहकांचा सुविधांसाठी आंदोलनाचा इशारा

अनिल जमधडे
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

औरंगाबाद, : स्मार्ट शहर बसचालक वाहकांना सोयीसुविधा देण्यात याव्यात, निष्कारण कारवाई होऊ नये आणि ओव्हरटाइम देण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा चालक-वाहकांनी दिला आहे. 

स्मार्ट सिटी बसच्या चालक-वाहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. समस्या सोडविण्यासाठी संयुक्त कृती समितीसाठी एसटी संघटना एकत्र आल्या आहेत. सिडको बसस्थानकात गुरुवारी (ता. 26) चालक-वाहक आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. याप्रसंगी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया, स्मार्ट शहर बसचे मुख्य चालन व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांची उपस्थिती होती.

यावेळी चालक-वाहकांनी समस्यांचा पाढाच वाचला. ज्या प्रमाणात ओहरटाइम मिळाला पाहिजे तो मिळत नाही. शहरातील थांबे योग्य नाहीत. त्यामुळे बस थांब्यांच्या पुढे उभे कराव्या लागतात. अनेक मार्गांवर प्रवाशांची संख्या अधिक आहे; परंतु बसची संख्या कमी आहे. थांबा सोडून बस थोडे अंतर जात नाही, तोच लाइन चेकिंगचे कर्मचारी तपासणी करतात. अशा वेळी एखादा प्रवासी विनातिकिटाचा असतो. प्रवाशाला दंडापोटी शंभर रुपयांचे तिकीट दिले जाते. मात्र, वाहकावर वाटेल तेवढ्या रकमेची दंडात्मक कारवाई केली जाते. अशाप्रकारे कारवाई होता कामा नये. महिला वाहकांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा नाही. त्यातून गैरसोयीला तोंड द्यावे लागत असल्याचेही महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावेळी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांवर उत्तर देऊन अधिकाऱ्यांनी समाधान करण्याचा प्रयत्न केला.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about smart bus