दिवाळीसाठी एसटीची अतिरिक्त बससेवा, विदर्भासह पुणे, नाशिक, बुलडाणा, जळगावसाठी जादा बस

अनिल जमधडे
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद,: दिवाळीनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने 24 ऑक्‍टोबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान प्रवाशांसाठी जादा बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. 

औरंगाबाद,: दिवाळीनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने 24 ऑक्‍टोबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान प्रवाशांसाठी जादा बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. 

दिवाळीमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते. त्यामुळेच प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने सिडको बसस्थानकातून मेहकर, रिसोड, अकोला, तर मध्यवर्ती बसस्थानकातून अकोला, नांदेड, बुलडाणा, जळगाव तर पैठण बसस्थानकातून पुणे, सिल्लोड बसस्थानकातून नाशिक, वैजापूर बसस्थानकातून नाशिक आणि सोयगाव बसस्थानकातून पुण्यासाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त औरंगाबादहून पुण्याला गेलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. दिवाळीच्या सुट्यांत ते शहरात येतात. त्याचप्रमाणे नोकरी व व्यवसायानिमित्त औरंगाबाद शहरात स्थायिक झालेल्यांची संख्या मोठी आहे. दिवाळीनिमित्त हा सर्व वर्ग आपल्या गावी जातो. त्यामुळेच एसटीला होणारी गर्दी लक्षात घेऊन महामंडळाने अतिरिक्त बसगाड्यांची सोय केली आहे. 
-- 
अशी आहे व्यवस्था 

--
सिडको- अकोला 09.30, सिडको- रिसोड 07.30, सिडको- मेहकर 09.00, मध्यवर्ती बसस्थानक- अकोला 08.30, 18.30, मध्यवर्ती बसस्थानक- नांदेड 06.00, मध्यवर्ती बसस्थानक- बुलडाणा 08.15, पैठण- पुणे 14.30, 15.45, मध्यवर्ती बसस्थानक- बुलडाणा 08.15, 09.30, मध्यवर्ती बसस्थानक- जळगाव 08.30, 11.45, सिल्लोड- नाशिक 07.30, मध्यवर्ती बसस्थानक- नाशिक 08.30, वैजापूर- नाशिक 07.45, 08.15, 14.00, 14.30, मध्यवर्ती बसस्थानक- धुळे 09.15, मध्यवर्ती बसस्थानक- पुणे 08.15, 09.00, 09.45, सोयगाव- पुणे 06.00 याप्रमाणे बससेवा चालवण्यात येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about st bus