निवडणुकीसाठी साडेचारशे एसटी बस सज्ज

अनिल जमधडे
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मतदान अधिकारी कर्मचारी व मतदानाचे साहित्य नेण्यासाठी तब्बल 448 एसटी बस बूक करून ठेवण्यात आल्या आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एसटी बस आरक्षित करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी (ता. 21) मतदान होत आहे. त्यामुळे रविवारी (ता. वीस) मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना घेऊन जाणे, मतदान साहित्य नेणे यासाठी 224 एसटी बस आणि दुसऱ्या दिवशी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर परतीसाठी पुन्हा 224 या प्रमाणे 448 बस आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

यासाठी निवडणूक विभागाने एसटी महामंडळाकडे तब्बल 61 लाख 76 हजार 502 रुपयांचा भरणा केला आहे. सिल्लोडसाठी 68, कन्नडसाठी 88, फुलंब्रीसाठी 66, पैठण 64, गंगापूर 80 आणि वैजापूरसाठी 82 या प्रमाणे एकूण 448 एसटी बस आरक्षित करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about st bus