तुळजापूरला आज गर्दीत वाढ शक्‍य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त शहरात भाविकांचा ओघ सुरू आहे.

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त शहरात भाविकांचा ओघ सुरू असून मंगळवारी (ता. एक) गर्दी वाढण्याची शक्‍यता आहे. 

दुसऱ्या माळेला सोमवारी (ता.30) भाविकांतर्फे सकाळी सहा ते दहापर्यंत अभिषेक पूजा झाल्या. सकाळी दहापासून सायंकाळपर्यंत धर्मदर्शन सुरू होते. ओटी भरण्यासह विविध धार्मिक कार्यक्रम दिवसभर सुरू होते. राज्यभरासह कर्नाटकातील भाविक येत असून घटस्थापनेच्या दिवशीही काल भाविकांची चांगली गर्दी होती. मंगळवारी भाविकांचा ओघ आणखी वाढेल, असा अंदाज मंदिर समितीसह व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 

तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास आलो. सायंकाळी पाचपर्यंत दर्शन घेऊन बाहेर आलो. 
- वैभव टेंभुर्णीकर, भाविक, गोविंदपुरा, पंढरपूर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Tuljapur