चाळीस वर्षे वर्तमानपत्र विकणारे मांडवकर जाणार नेदरलॅंडला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

केज : बीड जिल्ह्यातल्या केज शहरातील बसस्थानकात चाळीस वर्षांपासून वर्तमानपत्रे व पुस्तके विकणारे सुहास मांडवकर यांना नेदरलॅंड वारी घडणार आहे. या आनंदात गावातल्या मित्रांनी शनिवारी (ता. 28) त्यांचा सत्कारच केला. 

केज : बीड जिल्ह्यातल्या केज शहरातील बसस्थानकात चाळीस वर्षांपासून वर्तमानपत्रे व पुस्तके विकणारे सुहास मांडवकर यांना नेदरलॅंड वारी घडणार आहे. या आनंदात गावातल्या मित्रांनी शनिवारी (ता. 28) त्यांचा सत्कारच केला. 

केजच्या बसस्टॅंडवर सुहास मांडवकर चाळीस वर्षांपासून क्रांती बुक स्टॉलच्या माध्यमातून वर्तमानपत्रे विकतात. याच व्यवसायातून पै-पै जोडत त्यांनी मुलगा सुमित याला अभियंता बनवले. याच सुमितला त्याच्या कंपनीने नोकरीसाठी नेदरलॅंडला पाठविले आहे. वडिलांनी केलेल्या अपार कष्टामुळेच आपण परदेशात नोकरी करू शकतो, याची जाणीव ठेवून सुमितने वडिलांनाही आता नेदरलॅंडला बोलावले आहे. लवकरच मांडवकर पत्नीसह मुलाच्या भेटीसाठी परदेशात जात आहेत. 

वर्तमानपत्र विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. मुलांना चांगले शिक्षण दिले. कोणतेही काम प्रामाणिकपणे, सातत्य राखून केल्यास उद्दिष्ट साध्य करू शकतो. कोणताही उद्योग छोटा नसतो. त्यात सातत्य राखल्यास असे यश मिळते, हे सुहास मांडवकर यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळेच त्यांचा सत्कार केल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newspaper seller going to Netherlands